सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
निंबुत येथील गोळीबार प्रकरणातील जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू.
दि.२८ रोजी निंबुत ता. बारामती जि. पुणे येथे शर्यतीच्या बैलाच्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या गोळीबार प्रकरणांमधील रणजीत निंबाळकर मूळ राहणार तावडी ता. फलटण जि. सातारा सध्या राहणार स्वामी विवेकानंद नगर फलटण यांचा रुबी हॉस्पिटल पुणे येथे रात्री २ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे. व बैलगाडा शर्यत संघटना यांच्याकडून आव्हान करण्यात आलेले आहे की जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही रणजीत निंबाळकर यांचे पार्थिव स्वीकारणार नाही.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments