Type Here to Get Search Results !

.सरडे येथे वीज कोसळली मोटार सायकलवरून जाणारे ३ विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

सरडे येथे वीज कोसळली मोटार सायकलवरून जाणारे ३ विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू.


मौजे सरडे तालुका फलटण येथे वीज कोसळून मोटर सायकलवरून जाणारे तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. तिघांनाही बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यापैकी एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

1.मयत ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय 17  राहणार वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर.

2.जखमी प्रथमेश सुनील भिसे  वय 17 राहणार वायसेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर.

3.जखमी विक्रम विजय धायगुडे वय 16 राहणार सरडे.

वरील तिन्ही विद्यार्थी शारदानगर बारामती येथे iti चे शिक्षण घेत आहेत दोघे जखमी विद्यार्थी यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे. मयत विद्यार्थी याचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालय बारामती येथे करून त्याचे पार्थिव शरीर त्याच्या नातेवाईकांची ताब्यात देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121


Post a Comment

0 Comments