सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी विद्यालयात सौ पुष्पाताई फडतरे अष्टपैलू विद्यार्थिनी पुरस्कारांचे वितरण ..!
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातील माजी विद्यार्थिनी आणि सध्या बेंगलोर येथे प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या मोनाली अशोकराव फडतरे( IAAS) यांनी आपल्या मातोश्री सौ पुष्पाताई फडतरे यांचे नावाने साखरवाडी विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी पुरस्कार योजना गेल्या वर्षी पासून सुरू केली आहे.यावर्षी हे सौ पुष्पाताई फडतरे अष्टपैलू विद्यार्थिनी पुरस्कार विद्यालयातील कुमारी खलाटे वैष्णवी दिपक आणि घाडगे समीक्षा संजय या दोन विद्यार्थिनीना प्राप्त झाले.एकूण ११०००/- रुपयांची ही पुरस्कार योजना असून इयत्ता ५ वी ते १० पर्यंत कधीही कोणत्याही एक शासन मान्य सांघिक किंवा मैदानी खेळाच्या स्पर्धेत जिल्हा , विभाग , राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून इयत्ता १० वी शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या २ विद्यार्थिनींना हे पुरस्कार दरवर्षी दिले जाणार आहेत. साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झालेल्या या समारंभासाठी संस्था संचालक श्री राजेंद्र शेवाळे,कौशल भोसले ,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे , मोनाली फडतरेंचे पालक श्री अशोकराव फडतरे , सौ पुष्पाताई फडतरे , पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचे पालक, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.पुरस्कार समिती सदस्य तथा माध्यमिक विभागातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments