Type Here to Get Search Results !

कराड येथील सुर्या कॅफेवर पोक्सो कायद्या अंतर्गत कारवाई.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

कराड येथील सुर्या कॅफेवर पोक्सो कायद्या अंतर्गत कारवाई

कराड शहर पोलीसांकडुन विद्यानगर परीसरातील सुर्या कॅपेवर पोक्सो कायद्या अंतर्गत कारवाई दोघांना अटक.


                                                                                            

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील विद्यानगर, सैदापुर, बनवडी या कॉलेज परीसरातील

असणारे कॅफे हे नियमानुसार चालतात का ? या संदर्भाने कराड शहर पोलीस ठाणे कडील मा. वपोनि श्रीके.एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मपोकॉ. 2548 कांबळे, पोकों 2531 सांडगे पोकों 1564 शेडगे यांनी

दिनांक 28/06/2024 रोजी 11.45 वा. चे सुमारास विद्यानगर सैदापुर परीसरातील सुर्या कॅफेवर कारवाई केली

असता सदर कॅफेमधील दुस-या मजल्यावर आरोपी नामे जय संतोष पाटील वय 21 वर्षे रा. वडगावहवेली ता.

कराड जि.सातारा हा यातील पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिस सदर कॅफे मध्ये नेहुन

तिचेसोबत अश्लिल कृत्य करत असताना मिळून आला तसेच सदरचे कृत्य करणेसाठी यातील कॅफे मालक

अभिषेक सिध्दप्पा अंकलगी वय 33 वर्षे रा. मलकापुर ता. कराड जि.सातारा यांने मदत करत असल्याचे दिसुन

आले त्यामुळे यातील आरोपी जय संतोष पाटील वय 21 वर्षे रा. वडगावहवेली ता. कराड जि.सातारा व

कॅफेचालक अभिषेक सिध्दप्पा अंकलगी वय 33 वर्षे रा. मलकापुर ता. कराड जि.सातारा यांना ताब्यात घेवुन

पोलीस ठाणेत दाखल होवुन सदर आरोपीत यांचे विरुध्द म.पो.कॉ. 2548 कांबळे यांनी सरकारतर्फे कराड शहर

पोलीस ठाणेत दिले फिर्यादी वरुन कराड शहर पोलीस ठाणे गु. रजि. नं. 911/2024 बा.ले. अत्या. सं. कायदा 2012

चे कलम 8, 12, 17 भा.द.वि.स. कलम 354 (अ), 34 प्रमाणे दिनांक 28/06/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात

आलेला आहे. सदर गुन्हयात वरील आरोपीत यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सोो. श्री. समीर शेख मा. अपर पोलीस अधीक्षक सो.

आंचल दलाल मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. अमित ठाकुर श्री कराड शहर पोलीस ठाण्याचे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मपोकाँ. 2548 कांबळे, पोकॉ 2531 सांडगे

पोकों 1564 शेडगे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक श्री रत्नदिप भंडारे हे करीतआहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments