Type Here to Get Search Results !

तडीपार आदेशाचे उल्लंघन केलेल्या गुंडास शिताफीने अटक,

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

तडीपार आदेशाचे उल्लंघन केलेल्या गुंडास शिताफीने अटक,


कराड शहर पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगिरी.

कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील कुख्यात गुंडाने कराड शहरात विविध प्रकारचे गुन्हे करुन

त्याचेवर प्रतिबंधात्मक़ कारवाई करुनही तो प्रशासन व न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करीत असलेने त्याचेवर तडीपार

प्रस्ताव कराड शहर पोलीस ठाण्याकडुन पाठविला होता. सदर प्रस्तावाची चौकशीनंतर मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक

सो सातारा यांनी दोन वर्षाकरीता संपुर्ण सातारा जिल्हयासह लगतचे सांगली जिल्हयातील कडेगांव, वाळवा व शिराळा या

तालुक्यांचे महसुली हददीतुन हददपार करण्यात आले होते. आदेशाची अंमलबजावणी करुन खोपोली, येथे सरकारी

इतमामात सोडुन संबंधीत पोलीसांना त्याबाबत माहीती देणेत आली होती.

जिल्ह्यातील तडीपार गुंडांची माहिती काढून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलिस

अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कराड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक

के. एन. पाटील यांनी गुन्हे शाखेच्या पथक प्रभारी सहायक निरीक्षक गणेश कड तसेच पोलीस अंमलदारांना तडीपार गुंडांच्या

हालचाली पडताळणेबाबत आदेश दिले होते.

तडीपार असतानाही इसमनामे अक्षय आनंदा नाटकर, रा. विरवडे ता. कराड हा त्याचे राहते गांवी येवुन

राहील्याची बातमी कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळालेने

त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदारांना सदर बातमीची खातरजमा करुन कारवाई करणेचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड यांचे

मार्गदर्शनाखाली पो. हवा. अमित पवार, पो. अंमलदार आनंदा जाधव, महेश शिंदे, सहा. पो. उपनिरीक्षक संजय देवकुळे यांनी

दि. 29.06.2024 रोजी सकाळी 8 वा. चे सुमारांस विरवडे गांवी जावुन तडीपार इसम मिळुन आलेने पोलीसांना ओळखुन तो

पळुन जात असताना त्यांस शिताफीने पकडुन त्याचेकडे परवान्याबाबत खात्री करुन ताब्यात घेवुन अक्षय नाटकर यांस

अटक केली आहे.

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार तसेच हददपार गुंडांच्या हालचाली पडताळुन

त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम चालु असुन अशा प्रकारे कोणी निष्पन्न झालेस यापुढील काळातही

अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येणार असलेचा इशारा वजा आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन.

पाटील यांनी केले आहे. या कारवाईमुळे कराड शहरातील तडीपार गुंडांची तंतरली आहे.

सदरची कामगिरी मा. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल मॅडम, अपर पोलीस

अधीक्षक सातारा, मा. श्री. अमोल ठाकुर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व मा. श्री के. एन. पाटील

सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस

निरिक्षक गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सहा. पो. उपनिरीक्षक संजय देवकुळे, पोलीस अंमलदार

अमित पवार, आनंदा जाधव, महेश शिंदे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे. मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो, अप्पर

पो. अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी कराड शहर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments