सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शेती पंपाची चोरी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद.
दिनांक १६.०६.२०२४ रोजीचे दुपारी ०१.०० ते दि. २७/०६/२०२४ रोजीचे सकाळी
१०.०० वा. चे दरम्यान मौजे गमेवाडी ता. पाटण जि.सातारा गावचे हद्दीतील गट नं. २९/५
मधील चिरखाणी नावचे शिवारात उत्तरमांड नदीचे पात्रात जाळगेवाडी - गमेवाडी रस्त्यालगत
शेतीला पाणी पाजण्यासाठी ठेवलेली लक्ष्मी कंपनीची ५ एच.पी.ची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार
किंमत रुपये १८,०००/- ची तिचे पेटी जवळील केबल कापून अज्ञात इसमाने चोरुन नेहली
आहे. म्हणुन फिर्यादी नामे शकील अब्दुल मुल्ला वय ५५ वर्षे रा. गमेवाडी ता. पाटण जि.सातारा
यांनी दिले फिर्यादीवरुन मल्हारपेठ पोलीस ठाणे गु.र.नं. ९६ / २०२४ कलम ३७९, ३४ प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवुन गुन्ह्याचे घटनास्थळी मा. सपोनि मछले यांनी
तात्काळ भेट देवुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना मल्हारपेठ पोलीस ठाणे अंकीत
चाफळ दुरक्षेत्र कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना देण्यात आल्या होत्या.
नमुद गुन्हयाचे तपासामध्ये गोपनीय बातमीदारा मार्फत काही लोकांची माहीती प्राप्त झाली.
त्या दृष्टीने त्या लोकांच्या हालचाली पडताळल्या. त्यामध्ये तीन इसमांचे कडे अधिक चौकशी
केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. म्हणून त्यांना पोलीस ठाणे येथे
आणून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी लक्ष्मी कंपनीची ५ एच.पी.ची पाण्यातील
इलेक्ट्रीक मोटार असा १८,०००/- (आठरा हजार) रुपये किंमतीची चोरी केले बाबतची
कबुली दिली. व आरोपींच्या ताब्यातील लक्ष्मी कंपनीची ५ एच.पी.ची पाण्यातील इलेक्ट्रीक
मोटार असा १८,०००/- ( आठरा हजार ) रुपये किंमतीचा माल जप्त करुन तीन आरोपींना
अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. आँचल दलाल अप्पर
पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. सविता गर्जे, पोलीस उपअधिक्षक सो पाटण विभाग यांचे
मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. चेतन मछले सहा. पोलीस निरीक्षक, मल्हारपेठ पोलीस ठाणे, नितीश
पोटे पोलीस उपनिरीक्षक, रामराव वेताळ, पोलीस उपनिरीक्षक, सिध्दनाथ शेडगे पोलीस
कॉन्स्टेबल यांनी केली आहे.
आरोपींची नावे :- (१) अजय बापूराव जाधव, वय-३३ वर्षे, (२) पंकज सुनिल
पाटील, वय-२७ वर्षे, (३) संभाजी ऊर्फ गणेश शिवाजी भोसले, वय-३४ वर्षे, सर्व रा. माजगाव ता. पाटण जि.सातारा
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments