सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
एटीएम मशीनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेला आरोपी पोलिसांकडून जेरबंद.
पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली तळबीड / उंब्रज पोलीस ठाणेची संयुक्त कामगीरी
बँकेचे ए टी एम सेंटरमध्ये जेलीटीन कांडयाच्या सहाय्याने स्फोट घडवुन दरोडा टाकणेचे तयारीत असणा-या
टोळीस दरोडाच्या साहीत्यासह प्रसंग अवधान राखुन शिताफीने केले जेरबंद
मा. पोलीस अधिक्षक साो सातारा व अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस
अधिकारी साो कराड विभाग कराड यांनी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हाहद्दीत अधिकार व
अमंलदार यांनी सर्तक रात्रग्रस्त करणे बाबत सुचना देण्यात आले होत्या त्याप्रमाणे तळबीड पोलीस ठाणे प्रभारी
अधिकारी स.पो.नि.श्री. किरण भोसले यांना दि १६/०५/२०२४ रोजी कराड विभागीय रात्रग्रस्त होती त्यांचे सोबत
पोलीस ठाणेकडील पो. कॉ- ८९३ विभुते व चालक पो कॉ २४३१ पाटील हे होते शासकीय वाहनांने रात्रग्रस्त पेट्रोलिंग
करीत असताना उब्रंज पोलीस ठाणे हद्दीत शिवडे या गावाजवळी कृष्णा पुलाच्या अलिकडे रोडच्या बाजुस अंधारात
पाच ईसम दिसले त्यांच्या संशय आल्याने शासकीय वाहन काही अंतरवरीती थांबवुन उब्रज पोलीस ठाणेशी संपर्क
करुन मदतीसाठी पोलीस ठाणेकडील स.पो.नि श्री भोरे व स्टाफ यांना तात्काळ बोलावुन घेवुन व तळबीड व उज
पोलीस ठाणेकडील अधिकारी व स्टाफ यांनी चार संशयीत इसमांना घेराव घालुन ताब्यात घेतले त्याच्या एक
साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे पुढील प्रमाणे १) वैभव राजेंद्र साळुंखे
वय ३३ (२) ओंकार बाळासाहेब साळुंखे वय २३ (३) अदित्य संतोष जाधव वय १९ रा मोळाचा ओडा सातारा जि
सातारा व (४) विधीसंघर्ष बालक (५) पळुन गेलेला नांव गावं माहीत नाही.
ताब्यातील इसमांची अंगझडती मध्ये व त्यांच्या कब्जातुन खालील प्रमाणे दरोडयाचं साहीत्य मिळुन आले.
१) ०३ लहान मोठे कटावणी, (२) ०४ जिलेटीन कांडया (३) डेटोनेटर (४) लहान वॉटरी (५) एक्सा ब्लेड दोन (६)
मोठी करवत (७) कोयता (८) ब्लॉस्टींगची वायर (९) दोन मोटार सायकल वाहन (१०) तोंडाचे मास्क याप्रमाणे
एकुण १,३७,९८०/- (एक लाख सदतीस हजार नवशे रुपये ) किंमतीचे साहीत्य मिळुन आले. वरील इसमांच्याकडे
अधिक चौकशी केली असता त्यांनी सुमारे आठ दिवसापासुन मसुर येथील हीताची कंपनीचे एटीएम सेंटर जेलीटीने
स्फोट घडवुन दरोडा टाकणेचे प्लानिंग केले होते. त्याप्रमाणे त्यांनी चार ते पाच दिवासापुर्वी त्या एटीएम सेंट्रच्या
ठिकाणी रेखी करुन आले होते व आज रोजी ते ठरलेल्या प्लानिंग प्रमाणे सदरचे एटीएम सेंटर जेलीटीने स्फोट
घडवुन दरोडा टाकणेच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील होणारी मोठी घटना टळलेली आहे.
यापैकी संशयीत ईसम वैभव राजेंद्र साळुंखे याच्या विरुध्द कोरेगावं, वडुज पोलीस ठाणे येथे फसवणुकीचे गुन्हे
दाखल आहेत. यातील पळुन गेलेला संशयीत ईसम यांची माहीती अटक केलेल्या आरोपींचे कडुन त्यांचे नांव निष्पन्न
करुन त्यांस अटक करणेची तजवीज ठेवणेत आली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख मा अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल मा
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस
निरीक्षक श्री किरण भोसले, पो.कॉ ८९३ विभुते व चालक पो.कॉ २४३१ पाटील व उब्रज पोलीस ठाणे कडील
स.पो.नि.श्री भोरे पो.हवा १३२१ धुमाळ, पो.कॉ साळे, पो.कॉ माने यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ठ कामगीरी केली आहे. सर्व
अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधिक्षक साो सातारा यांनी अभिनंदन केले आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास
स.पो.नि श्री भोरे उब्रज पोलीस ठाणे हे करीत आहे.
Post a Comment
0 Comments