सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
कराड शहर पोलीस ठाणेची मोठी कारवाई
महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन 5 लाख 70 हजाराचे एकुण 29 मोबाईल परत मिळवुन
तक्रारदार यांना श्री. के. एन. पाटील सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांचे हस्ते केले परत
श्री. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा, मा.
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. यांनी मा. के. एन. पाटील सो. वरिष्ठ पोलीस
निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांना कराड शहर ही सातारा जिल्हयातील एक मुख्य बाजारपेठ असुन पोलीस ठाणे
हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेवुन सदर मोबाईल तक्रारीबाबत गांभीऱ्याने लक्षदेवुन जास्तीत
जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मा. के. एन. पाटील सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कराड शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गहाळ झाले मोबाईलचा
तात्काळ छाडा लावण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार तात्काळ कारवाई करत महाराष्ट्र तसेच इतर विविध
राज्यातुन 5 लाख 20 हजाराचे एकुण 25 मोबाईल परत मिळवुन तक्रारदार यांना श्री. के. एन. पाटील सो वरिष्ठ पोलीस
निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांचे हस्ते केले परत
कराड शहर हे सातारा जिल्हयातील एक मुख्य बाजार पेठ आहे. त्यानुसार कराड शहरास एक मोठी
ओळख आहे. कराड शहरात आजुबाजुचे गावातुन दररोज हजारोच्या संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षणासाठी
कराडमध्ये येत असतात. त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व ईतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक
आहे. पोलीस उप निरीक्षक श्री पतंग पाटील व पथकाने अश्या गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाणेच्या
माध्यमातुन माहिती प्राप्त करुन सदर माहितीचे पोलीस अमंलदार संग्राम पाटील व महेश शिंदे यांनी तांत्रिक विषलेशन
करत महाराष्ट्र राज्याचे विविध भागातुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल
तक्रारदार यांना परत केले आहेत. गरीबीची परस्थिती असताना देखील कर्ज काढुन घेतलेले मोबाईल हरवले असता
त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन पोलीस प्रशासना विषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत
आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल
सो. सातारा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
के.एन.पाटील सो.कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक
पतंग पाटील पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. संग्राम
पाटील, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, यांनी केलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments