सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
15लाख 30 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 17 मोटरसायकल जप्त.
पोलीस अधीक्षक समीर शेख सो. यांचे मार्गदर्शनाखाली कराड डी.बी. पथकाची कारवाई
कराड शहर डी. बी. पथकाची धडाकेबाज कारवाई एका सराईत मोटर सायकल चोराला ठोकल्या बेडया
तब्बल 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 17 मोटर सायकल केल्या जप्त
श्री. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस
अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. यांनी कराड शहरात तसेच उप नगरात होणाऱ्या मोटर सायकल चोरी बाबत विशेष
आढावा घेवुन कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री के. एन. पाटील सो. यांना मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाचा तात्काळ
छडा लावणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांनी व्युव्ह रचना तयार केली. आणि
सदर कारवाईस मोठे यश मिळुन कराड डी. बी. पथकाने एका सराईत मोटर सायकल चोरास मोठया शिताफीने अटक् करुन 15 लाख
30 हजार रुपये किंमतीच्या 17 मोटर सायकल जप्त केल्या आहेत. मागील काही वर्षातील चोरीच्या मोटर सायकल जप्त करण्याची ही
सर्वात् मोठी कारवाई मानली जात आहे.
दिनांक 13/05/2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक पतंग
पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना कराड शहर तसेच उप नगरात गस्त करणेबाबत आदेशित केले होते. सायकांळी 17.30
वाजताचे सुमारास आगाशिवनगर परिसरात गस्त करीत असताना एक इसम संशयीत रित्या मोटर सायकल वर फिरताना दिसुन आला
पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन चौकशी केली असता
त्याचे ताब्यातील मोटर सायकल कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीस पोलीस ठाणेस आणुन
पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो. यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन डी. बी. पथकाचे मदतीने अधिक तपास केला असता
नमुद आरोपीने कराड शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतुन एकुण 17 मोटर सायकल चोरी केल्याचे सांगितले होते. अटक करण्यात
आलेल्या आरोपीचे नाव - प्रकाश बाबासो निंबाळकर वय 45 वर्षे रा. मौजे सांगाव ता. कागल जि. कोल्हापुर असे असुन त्याचे
ताब्यातुन पुढील प्रमाणे 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या एकुण 17 मोटर सायकली जप्त करत कराड शहर पोलीस ठाणेचे पुढील गुन्हे उघड केले आहेत.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments