सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
तडीपार किरण रमेश आवारे याच्यावर 142 प्रमाणे लोणंद पोलिसांची कारवाई.
तडीपार आरोपी किरण रमेश आवारे रा. बिबी ता. फलटण याचेवर महाराष्ट्र कायदा कलम 142 प्रमाणे लोणंद पोलीसांची कारवाई
टोळीप्रमुख इसम नामे किरण रमेश आवारे रा. बिबी ता. फलटण जि. सातारा यास सातारा जिल्हा व पुणे जिल्हा येथुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे दिनांक 27/2/2024
रोजी हददपार करण्यात आला होता. परंतु आज दिनांक 14/5/2024 रोजी तो त्याचे घरातील
लोकांना बिबी गावात भेटण्यास आल्याची माहीती सपोनि श्री सुशिल भोसले यांना मिळाल्याने
त्यांनी पोहवा सर्जेराव सुळ व पोना सिदधेश्वर वाघमोडे यांना किरण आवारे हा घरी आला आहे
काय याची खात्री करणेकामी त्याचे घरी बिबी येथे पाठविले असता तो घरी मिळुन आला आहे.
सदर इसम हा कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची सातारा जिल्हयात येण्यापुर्वी परवानगी न घेता
सातारा जिल्हयात प्रवेश केलेला मिळुन आला आहे. त्याचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहवा चंद्रकांत काकडे करीत आहोत.
सदरची कारवाई मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल अपर
पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे
मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस
निरीक्षक, पोलीस अंमलदार सर्जेराव दिनकर सुळ, सिध्देश्वर तात्याबा वाघमोडे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments