WUSHU राष्ट्रीय स्पर्धेमध्ये साखरवाडी च्या कु. वैष्णवी मोहिते ला ब्राँझ मेडल
प्रतिनिधी
दादा जाधव
भारतीय WUSHU महासंघ व बिहार WUSHU संघटना आणि बिहार सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 06 ते 11 ऑगस्ट 2023 रोजी पाटलीपुत्र स्टेडियम- पटना येथे 22 वी राष्ट्रीय ज्युनिअर WUSHU स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली या स्पर्धेमध्ये देशांमधून 25 राज्यांपेक्षाही जास्त राज्यांनी सहभाग नोंदविला
या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षिस वितरण सोहळा मा श्री जितेंद्र कुमार रॉय- राज्य क्रीडामंत्री व मा श्री रवींद्र शंकरन- संचालक क्रीडा व युवक सेवा- बिहार, यांच्या शुभहस्ते पार पडला या स्पर्धेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी चे सरदार वल्लभभाई हायस्कूल व जुनियर कॉलेज- साखरवाडी ची खेळाडू कु वैष्णवी तुषार मोहिते हिने 56 किलो वजन गटांमध्ये महाराष्ट्राच्या वतीने प्रतिनिधित्व करून या स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक मिळविले त्याबद्दल तिचे व तिचे प्रशिक्षक श्री तुषार मोहिते सर यांचे मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मा सभापती व विद्यमान आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य, मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष- जि प सातारा ,अध्यक्ष- महाराष्ट्र खो खो असोसिएशन, श्री भोजराज नाईक निंबाळकर - अध्यक्ष स्कूल कमिटी श्री बापूसो नाईक निंबाळकर व्हाईस चेअरमन, श्री अरविंद निकम सर- प्रशासन अधिकारी श्रीकांत फडतरे सर अधीक्षक, सर्व पदाधिकारी, श्री शिवाजी काळे सर- प्राचार्य, सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
Post a Comment
0 Comments