फलटण/वैभव जगताप
मौजे राजाळे,ता.फलटण,जि.सातारा. येथील
राजाळे गावचे सुपुत्र शहीद वैभव संपतराव भोईटे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाकरिता पोहचले, फलटण संस्थानचे अधिपती व विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
देशाकरिता जन्म आपुला,असे आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणारे वीर योद्धा माझ्या तालुक्यामध्ये जन्माला आले ह्याचा मला सार्थ अभिमान आहे
आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करून भारत देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे परमवीर माझ्या महाराष्ट्रात नव्हे तर प्रत्येक राज्यात असे परमवीर जन्माला आलेले आहेत खर तर ह्या संपूर्ण इतिहासाची साक्ष देणारा हा एक वेगळाच इतिहास आहे वर्षेना वर्ष आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा त्याग करून आपल्या मातृभूमीचे संरक्षणच नव्हे तर भारतमातेची अस्मिता राखण्याचे काम हे आपले वीर जवान करत आहेत ह्या माझ्या वीर जवानांच्या बद्दल किती बोलावे आणि काय बोलावे हे मला आज समजत नाही खरोखरच मी आज निशब्द आहे,
ह्या संपूर्ण भोईटे कुटुंबाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे फलटण तालुका म्हणजे माझे कुटुंब आहे मी आज संपूर्ण भोईटे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे याप्रसंगी राजाळेगावचे ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते
Post a Comment
0 Comments