फलटण/वैभव जगताप
विधान परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा फलटण तालुका साखर कामगार युनियन यांच्या हस्ते साखरवाडी,ता.फलटण,जि.सातारा. गणपती मंडप येथे आयोजित करण्यात आला
बरेच दिवस प्रलंबित असलेला कारखान्यातील कामगारांचा ग्रेडेशन हा प्रलंबित प्रश्न श्रीमंत रामराजे यांनी गांभीर्याने घेऊन श्री दत्त इंडियाच्या संचालिका प्रिती रुपारेल, जितेंद्र धारु, महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी महामंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप या सर्व प्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले, अजूनही काही कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत तेही भविष्यामध्ये मार्गी लागतील परंतु कामगारांनी आगामी गळीत हंगामामध्ये एकही दिवस कारखाना बंद न ठेवता किंवा कारखान्याला वेठीस न धरता साथ देण्याचे आव्हान केले गेले आहे
मी कायम स्वरुपी शेतकरी व कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी ग्वाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली
या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री दत्त इंडियाच्या व्यवस्थापिकीय संचालिका प्रीती रूपरेल, जितेंद्र धारू, महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी तात्यासाहेब काळे कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, डि के पवार, शंकर आप्पा माडकर, रेश्माताई भोसले, सागर कांबळे, संजय भोसले,सतीश माने, नितीन शाहूराजे भोसले, रमेश बोंद्रे, सचिन भैय्या भोसले, पै.संतोष भोसले, पै.महेश भोसले, गोरख भोसले, सुरेश नाना भोसले, निवृत्ती भोसले, सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि पंचक्रोशितील राजेगटाचे कार्यकर्ते व शेतकरी बंधू उपस्थित होते
Post a Comment
0 Comments