सह्याद्री निर्भिड न्यूज
प्रतिनिधी/ साखरवाडी
रामोशी समाजाचे प्रश्न संधी मिळाल्यास विधानसभेत मांडणार.-वैभव पवार
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सालाबादप्रमाणे उत्साहात पार पडली राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे ईच्छुक उमेदवार वैभव पवार यांनी संधी मिळाल्यास रामोशी समाजाचे प्रश्न थेट विधानसभेत मांडणार असल्याचे आश्वासन समाजबांधवांना दिले.
या कार्यक्रमावेळी लक्ष्मण खोमणे, अशोक चव्हाण, तानाजी खोमणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुका अध्यक्ष दादासाहेब जाधव, बबलूभैया बारगळे,योगेश बोडरे,सुशांत चव्हाण, आजित जाधव,प्रकाश जाधव आदी समाजबांधव उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments