सह्याद्री निर्भिड न्यूज
काळजी/वैभव जगताप
शेतकऱ्यांचे डाळिंब चोरणारी टोळीला स्थानिक ग्रामस्थांनी शिताफीने पकडले.
मौजे काळज ता.फलटण जि.सातारा येथे बहुतांश शेतकरी हा डाळिंब उत्पादक आहे रात्रंदिवस काबाड कष्टकरून आपली पिके जगवण्याचा संघर्ष करताना दिसत आहे परंतु येथील शेतकऱ्यांची व्यथा खुपचं निराशाजनक आहे कारण हातात आलेले डाळिंबा सारख्या फळांची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे रात्रंदिवस गस्त घालीत शेतकरी जगण्याचा संघर्ष करत आहे आणि आज दि.८/९/२०२४ रोजी सकाळी डाळिंब चोरणारी टोळी शेतकऱ्यांच्या हाती लागली आरोपी विकास धुळा भोसले रा.पाडेगाव (तुकाई नगर) समीर विकास भोसले रा.पाडेगाव, सौरभ काळे हा येथुन पळून जाण्यात यशस्वी झाला व या सर्वांना काळज नजीक बडेखान येथील चांद पवार हा त्यांना डाळिंबाची चोरी करण्याकरिता बोलवत असल्याचे उघड झाले आहे.तरी तेथील स्थानिक नागरिकांनी यातील आरोपी क्रमांक १व २यांना चांगलाच चोप देऊन लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Post a Comment
0 Comments