सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सातारा शहरात कोबींग ऑपरेशन दरम्यान २ पिस्टल ३काडतुस २ मोटार सायकल असा २,२५,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
(स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची दमदार कारवाई)
(कोंबींग ऑपरेशन दरम्यान पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत
काडतुसे, २ मोटार सायकल असा २,२५,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.)
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांनी गणेशोत्सवाचे अनुशंगाने दि. ०९/०९/२०२४ रोजीचे २३.०० वा ते दि.१०/०९/२०२४ रोजीचे
०२.०० वा.चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेस सातारा शहरात कोंबींग ऑपरेशन तसेच राष्ट्रीय महामार्गावर
गुन्हे प्रतिबंधक पेट्रालिंग करुन पोलीस अभिलेखावरील आरोपी व अन्य संशईत इसमांना चेक करुन प्रभावी
कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे,
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक
तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व परितोष दातीर यांचे पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर
पेट्रोलिंग करीत असताना म्हसवे गावचे हद्दीत डि. मार्ट ते वाढे फाटा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चे
सर्व्हिसरोड वरील म्हसवे गावाकडे जाणारे पुलाचेखाली पोलीस अभिलेखावरील आरोपी प्रथमेश उर्फ टॉम
बाळासाहेब जगताप, रा. वर्ये, ता. जि. सातारा व २ अनोळखी इसम उभे असल्याचे दिसले. पोलीसांचे वाहन
दिसताच त्यापैकी २ इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. एका इसमास पथकातील पोलीसांनी शिताफि
पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात १,४०,०००/- रुपये किमतीची २ देशी बनावटीची
पिस्टल, ६००/- रुपये किमतीचे ३ जिवंत काडतुसे व ८५,०००/- रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल
मिळून आल्याने त्यांचे विरुध्द सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं. ३६२३ / २०२४ भारतीय शस्त्र अधिनियम
(सुधारीत २०१९) चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून ९५ देशी बनावटीची पिस्टल, ४ बारा बोअर रायफल, २२१ जिवंत
काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आले आहे.
श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,
रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष
सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अरुण
पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, अमोल माने, प्रविण कांबळे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ,
स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम,
पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, स्वप्नील दौंड, प्रविण पवार, प्रिती पोतेकर, शिवाजी गुरव,
अमृत कर्पे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर
शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन
केलेले आहे.
Post a Comment
0 Comments