Type Here to Get Search Results !

गणेशोत्सव हा सण कायदा सुव्यवस्था अबाधित राखुन साजरा करावा -पो.नि.सुनील महाडीक

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

गणेशोत्सव हा सण कायदा सुव्यवस्था अबाधित राखुन साजरा करावा -पो.नि.सुनील महाडीक.




 

दि.१०/०९/२०२४ फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी साखरवाडी येथील पोलिस चौकी मध्ये साखरवाडीतील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना बोलावून सुचना देण्यात आल्या की गणेशोत्सव काळामध्ये मिरवणूक विसर्जन व रोज लावण्यात येणारे स्पीकर्स यांचे ध्वनिप्रदूषण होणार नाही याची प्रत्येक मंडळांनी काळजी घ्यायची आहे, डॉल्बी, लेझर लाईट्स याचा अजिबात ही वापर करायचा नाही, श्री गणेशांच्या मिरवणुकीच्या वेळेस पारंपारिक वाद्यांमध्ये ही मिरवणूक  निघावी ही आपणा सर्वांना विनंती आहे. व गणेशोत्सव काळात राजकीय किंवा धार्मिक तेड निर्माण होईल असे कुठलेही देखावे अथवा बॅनर लावायचे नाहीत. शांतता भंग झाल्यास त्या मंडळावरती व त्या मंडळाच्या सदस्यांच्या वरती कठोर कारवाई करण्यात येईल. 

गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी सांस्कृतिक, धार्मिक, मुलांच्यासाठी स्पर्धा अथवा त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे काही मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे. किंवा रक्तदान शिबिराचे आयोजन करावे जेणेकरून तुमच्या रक्त दानातुन कोणाचे तरी प्राण वाचतील असे दिशादर्शक कार्यक्रम ठेवावे.पोलीस हे तुमचे दुश्मन नाहीत, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असतो.तुमचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

 दि.१६/०९/२०२४ रोजी महंमद पैगंबर जयंती (ईद -ए -मिलाद) असल्याने, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी विनंती केली की हा सण तुम्ही १६ तारखे ऐवजी १९ तारखेला साजरा करावा, आम्ही तुम्हाला पोलीस बंदोबस्त देऊ तरी सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन पोलिस प्रशासनास सहकार्य केले त्या बद्दल फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांचे आभार मानले.या प्रसंगी साखरवाडी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहाय्यक फौजदार पी.बी.हजारे, हवालदार पिसे, कॉन्स्टेबल शिंदे, साखरवाडी, पिंपळवाडी गावचे पोलीस पाटील सचिन पवार,होळ गावचे सरपंच दिलावर मेटकरी सर्व गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मुस्लिम बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments