सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
शाहुपूरी पोलीसांची डॉल्बी मालकावर केली कारवाई.
मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. वैशाली कडुकर
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले, यांनी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे
शाहुपुरी पोलीस ठाणे यांना शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमण सोहळयामध्ये
मोठयाने डॉल्बी लावुन ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 चे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी मालकांवर
कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे दि.01/09/2024 रोजी शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमन
सोहळामिरवणुक दरम्यान सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्य
तारा गणेश मंडळ या मंडळाचे समोर वाजविण्यात आलेल्या डॉल्बी चालकावर महाराष्ट्र पोलीस
अधिनियम 1951 सुधारीत 2012 प्रमाणे संबंधितावर मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात
आले आहेत. तसेच दि. 02/09/2024 रोजी भुई गल्ली तरुण मंडळ ढोणे कॉलनी सातारा यांचे
गणपती आगमन सोहळा मिरवणुक राजवाडा ते देवी चौक अशी सार्वजनिक रोडवर मिरवणुक
घेवुन जात असताना भुई गल्ली तरुण मंडळ यांनी पाटील प्लस साऊंड सिस्टीमचा टेम्पो
एम.एच.11 एफ-3147 वर लावुन सार्वजनिक रोडवर मोठमोठयाने वाजवुन ध्वनी प्रदुषणाचे
उल्लंघन केले असल्याने शाहुपुरी पोलीस ठाणे चे बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी सदर साऊंड सिस्टीमचा ध्वनी मापक यंत्राद्वारे मोजनी करुन सदर साऊंड
सिस्टीम मालकावर ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 प्रमाणे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेत
आलेली आहे. तसेच टेम्पो एम. एच. 11 एफ-3147 या वाहन मालकाने वाहनाचे चेसी व
बॉडीमध्ये बेकायदेशीर बदल केला असल्याने सदरचे वाहन पुढील कारवाई कामी मा. उप-
प्रादेशीक परिवहन कार्यालय येथे जमा करणेत आलेले आहे.
Post a Comment
0 Comments