सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
बियर बारचे शटर तोडुन ४१,०००/-रू.किंमतीची दारूची चोरी करणारे अल्पवयीन बालगुन्हेगार पुसेगाव पोलीसांच्या ताब्यात.
हॉटेल व बियर बारचे शटर तोडून सुमारे ४१,०००/- रुपयांची विदेशी दारुची चोरी करणारे तीन अल्पवयीन वालगुन्हेगारांस चोरीच्या संपूर्ण मुददेमालासह पुसेगाव पोलीसांनी घेतले ताब्यात.
दिनांक २५/०८/२०२४ रोजी रात्री १०.०० ते दिनांक २६/०८/२०२४ रोजी सकाळी ०६.४२
वाजणेचे दरम्यान मौजे खटाव ता. खटाव जि. सातारा येथील पुसेगाव ते वडूज जाणारे रोडलगत
फिर्यादी आकाश विजय बोबडे रा. खटाव ता. खटाव यांचे मालकीचे हॉटेल पंचतारा परमीट रुम ॲन्ड
बिअर बारचे लोखंडी शटरचे दरवाजाचे कुलूप लोखंडी गजाने तोडून आत प्रवेश करुन हॉटेल व
बिअर बारमधील सुमारे ४१,०००/- रुपये किमतीची विदेशी दारुचे बॉक्स चोरुन नेलेबाबत फिर्यादी
यांनी अज्ञात चोरटयाविरुध्द दि. २९/०८/२०२४ रोजी पुसेगाव पोलीस ठाणेस फिर्याद दिलेली होती.
सदर गुन्हयातील फिर्यादीचे बियर बारमधील दारुचे बॉक्स चोरणारे आरोपींना निष्पन्न करुन
त्यांना गुन्हयामध्ये अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेला माल जप्त करणे हे पुसेगाव पोलीसांचे
समोर खूप मोठे आव्हान होते. सदर चोरीच्या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत श्री. संदीप पोमण
सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस स्टेशन यांनी त्यांचे सहकारी व गोपनीय बातमीदारांच्या
मदतीने व तपास कौशल्याचा वापर करुन अज्ञात आरोपींचा शोध घेणेकामी अथक परिश्रम
करुन, सापळा रचून गुन्हा दाखल झालेनंतर तीनच दिवसांचे आत अज्ञात आरोपींचा व चोरीस
गेलेल्या मालाचा कसोशीने शोध घेऊन हॉटेल व बियर बार फोडून चोरी करणारे सराईत
बालगुन्हेगार नामे १) शामील अतुल शिंदे वय १६ वर्षे, ०८ महिने, १५ दिवस, मूळ रा. विडणी
ता.फलटण जि.सातारा सध्या रा. सिध्देश्वर कुरोली ता. खटाव जि. सातारा २) संचित नंत्या ऊर्फ
नंतास शिंदे वय १४ वर्षे, ०२ महिने ०८ दिवस रा. सिध्देश्वर कुरोली ता. खटाव जि. सातारा ३) कैफ
किर्लोस्कर शिंदे वय १४ वर्षे, ०२ महिने ०५ दिवस, रा. भांडेवाडी ता. खटाव जि.सातारा यांना
गुन्हयामध्ये निष्पन्न करुन त्यांचा ताबा घेण्यात आला. नमूद बालगुन्हेगार यांचेकडे त्यांचे
नातेवाईकांसमक्ष चौकशी केली असता त्यांनी गुन्हयामध्ये चोरी केलेला सर्व मुददेमाल ठेवल्याचे
ठिकाण दाखवले व चोरी केलेला सर्व मुददेमाल काढून दिला असून गुन्हयामध्ये चोरीस गेलेले
सुमारे ४१,०००/- रुपये किमतीचे दारुचे बॉक्स त्यांचेकडून हस्तगत करण्यात आले आहेत. नमूद
बालगुन्हेगार यांनी औंध पोलीस स्टेशनच्या हददीतही घरफोडी, चोरीचे गुन्हे केलेले आहेत. पुसेगाव
पोलीस ठाणे हददीत चोरी, घरफोडी व मालमत्तचे गंभीर गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारांचा शोध
घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून चोरीचा मुददेमाल हस्तगत करुन गुन्हेगारांच्या मुसक्या
आवळणा-या पुसेगाव पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीबददल श्री. संदीप पोमण सहाय्यक पोलीस
निरीक्षक यांचे व त्यांचे सहका-यांचे जनतेतून कौतुक व अभिनंदन होत आहे.
श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधिक्षक
सातारा व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली
श्री.संदीप पोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार श्री. योगेश बागल, पोलीस नाईक
श्री. सुनिल अबदागिरे,प्रमोद कदम, अशोक सरक, तुषार बाबर, पोलीस काँस्टेबल अविनाश घाडगे,
अमोल जगदाळे, मंगेश डोंबे यांनी सदरची कामगिरी केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व
अंमलदार यांचे श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक, श्रीमती वैशाली कडूकर व श्रीमती सोनाली कदम
उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment
0 Comments