Type Here to Get Search Results !

लोणंद पोलीस ठाणे ३ पुरस्काराने सन्मानित.

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

 लोणंद पोलीस ठाणे ३ पुरस्काराने सन्मानित.


  मौजे लोणंद ता.खंडाळा जि.सातारा येथील लोणंद पोलीस ठाण्याचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२४ या महिन्यांमध्ये लोणंद पोलिसांनी ५ गुन्हे उघडकीस आणून यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल २,२०,०००/- हस्तगत केला तसेच एन बी डब्ल्यू वॉर्ड मधील ८ आरोपीना अटक करण्यात आली.


सदर कामगिरी बाबत माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री.समीर शेख यांनी लोणंद पोलीस ठाणेस -बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ, बेस्ट रिकवरी ऑफ द स्टोलन प्रॉपर्टी, तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन NBW, हे पुरस्कार व रोख रक्कम बक्षीस  देऊन सन्मानित करण्यात आले.या कामगिरीचे लोणंद पोलीस ठाण्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments