सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
पवार साहेब शरीराने त्यांच्याबरोबर होतो परंतु मनाने तुमच्या बरोबरच होतो-श्रीमंत संजीवराजे.
दि.१४ रोजी फलटण येथील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की पवार साहेब आम्ही शरीराने फक्त तिकडे (महायुती मध्ये) होतो परंतु मनाने आम्ही तुमच्याकडेच होतो ही खरी वस्तुस्थिती आहे.परंतु अलीकडच्या काळामध्ये फलटण हा मतदारसंघ हा वेगळ्याच महायुतीचा असल्यासारखे काही जण आमच्याशी वागायला लागले आमच्याच कार्यकर्त्यांना नाहक त्रास देऊन खोट्या केसेस मध्ये गुन्हे दाखल करण्यात येत होते, नको त्या प्रकारचा अन्याय होत गेला व आमच्या कार्यकर्त्यांना महायुतीत असतानाही धमकी देऊन पक्ष प्रवेश करण्यासाठी दबावतंत्र तयार केले जायचे.
आपला स्वाभिमान आणि आपली अस्मिता राखायची असेल तर आपल्याला नव्हे तर संपूर्ण देशाला पवार साहेबांच्या शिवाय पर्यायच नाही, पवार साहेबांचे आपल्या मतदारसंघावर अनंत असे उपकार असुन ते आपल्याला कदापि विसरता येणार नाहीत. त्यामुळे राम कृष्ण हरी आणि वाजता तुतारी...!
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शरदचंद्रजी पवार, जयंत पाटील,आ.दिपकराव चव्हाण, खा.डाॅ.अमोल कोल्हे, खा.धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रभाकर घार्गे व माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा मतदार संघातील सर्वच मानयवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments