सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण तालुक्याती अष्टपैलू नेतृत्व उद्या हाती घेणार तुतारी..!
फलटण तालुक्यातील बलाढ्य असे अष्टपैलू नेतृत्व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कार्यक्षम आमदार दीपक चव्हाण अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देत उद्या फलटण येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. महायुतीसह अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
फलटण येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ न प फलटण चे माजी नगरसेवक युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामधे पक्ष प्रवेश व जाहीर सभा १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे होणार आहे .
Post a Comment
0 Comments