Type Here to Get Search Results !

कोयनानगर पोलीस ठाणेची दमदार कारवाई.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कोयनानगर पोलीस ठाणेची दमदार कारवाई.


दि. ०२/१०/२०२४ रोजी १८.०० वा. सुमारास तीन अनोळखी इसमांनी सौ. भागाबाई धाकलु झोरे, वय ६५ वर्षे,

शेती, रा. पळयाचावाडा (दास्तान ) ता. पाटण, जि. सातारा, मो.नं. ९७६७१३०३५८ यांच्या गळयातील

मंगळसुत्र (दाग्यात बटविलेले एक मोठे डोर्ले व १० मनी) जबरदस्तीने खेचुन पाठिमागुन येणाऱ्या काळया रंगाच्या मोटर

सायकलवरील अनोळखी इसमाचे मागे बसुन कराड ते चिपळूण जाणाऱ्या रोडकडे पळुन गेले. रक्कम रुपये ३५,०००/-

किंमतीचे सोन्याची मोठया पात्याची डोरल (मंगळसुत्र) व १० सोन्याचे मनी जु. वा. कि. अ. जबरीने चोरुन नेल्यावरुन

इकडील पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५०/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०४, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात

आला होता. तसेच दि. ०७/१०/२०२४ रोजी १८.०० वा. सुमारास श्रीमती लक्ष्मी गोपाळ पाटील, वय-७५ वर्षे, व्यवसाय

गृहीणी, रा. जी-१, ३७/०७, मारुती मंदीर शेजारी, कोयनानगर, ता. पाटण, जि. सातारा, मो.नं. ९४०५९५८९७४ या मौजे

कोयनानगर, मारुती मंदीर ते मॉडेल (स्टॅच्यू) डांबरी रोडवर, ता. पाटण, जि. सातारा येथे चालत जात असताना, त्यांचे

अचानकपणे १० ग्रॅम सोन्याची मोहनमाळ जबरदस्तीने खेचुन चोरुन घेवुन गेले. नमुदची माहिती प्राप्त होताच मौजे

हेळवाक ते मौजे मोरगिरी गावाच्यांमधील सर्व गावांना तसेच पाटण, मल्हारपेठ व ढेबेवाडी पोस्टेस नमुद घटनेच्या

अनुषंगाने नाकाबंदी लावणेस कळविले. त्यानुसार नमुद इसमांपैकी मौजे झाकडे, ता. पाटण येथे गावातील लोकांच्या

मदतीने एका इसमाला पकडले त्याचे नाव रविंद्र एकनाथ लुगडे असे असल्याचे समजले.

मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक,

सातारा, श्री विजय पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली

कोयनानगर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे अधिक शोध घेवुन १. प्रविण

बबन मोरे, वय-३१ वर्षे रा. एरफळे, ता. पाटण यास कोयनानगर पोलीस ठाणे गु.र.नं. ५२/ २०२४ कलम ३०४(२), (५)

बी.एन.एस प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचबरोबर कोयनानगर पोलीस ठाणे गु.र.नं. ५०/२०२४

कलम ३०४(२), (५) बी.एन.एस रविराज जयवंत भोसले, वय-२५ वर्षे रा. सोनवडे, ता. पाटण यांस अटक करण्यात

आले आहे. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचेकडुन गुन्ह्यात वापरलेल्या ०२ मोटारसायकल (प्लसर व

स्पलेंन्डर) व रक्कम रुपये १,०५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली

पल्सर मोटारसायकल चोरीतील असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत नांदेड ग्रामीण पोस्टे येथे गु. र. नं. ५२२ / २०२४

भा. द. वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोउपनि एस. आर. शिंदे व पोहवा. १६ एस. डी.

गायकवाड नेम. कोयनानगर पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदर आरोपी यांच्याकडून १) कोयनानगर पोलीस ठाणे गुरनं ५०/२०२४ भादंवि ३०४(२), ३(५)

बी.एन.एस.२०२३ २) कोयनानगर पोलीस ठाणे गुरनं ५२ / २०२४ भादंवि ३०४ (२), ३(५) बी.एन.एस.२०२३ ३) नांदेड

ग्रामीण पोस्टे येथे गु. र. नं. ५२२/२०२४ भा. द. वि. कलम ३७९ असे गुन्हे उघड केले असून नमुद गुन्हयातील

चोरीस गेलेले १,०५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व एक पल्सर मोटार सायकल हस्तगत केली आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, मा. अपर

पोलीस अधीक्षक, सातारा मा. श्री विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण, श्री अरुण देवकर पोलीस

निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली श्री. एस. के. ओलेकर, सपोनि.

कोयनानगर पोस्टे, श्रेपोउनि. एस. आर. शिंदे, पोहवा. १६ एस. डी. गायकवाड, पोहवा. ६५६ पाटणकर, पोहवा. ३८१

आर. एस. चव्हाण, नेम. कोयनानगर पोस्टे, पोहवा. २१८६ ढाणे, नेम सातारा तालुका (संलग्न कोयनानगर पोस्टे).

पोना. ११५१ डी. डी. मदने, पोना. १०३७ एस. पी. दडस, नेम. लोणंद पोस्टे (संलग्न कोयनानगर पोस्टे), पोकॉ. ५३८

ए. बी. निकम, पोकॉ. १२२२ ए. व्ही. पवार, पोकॉ. २५९९ एस. यु. निंबाळकर, नेम. कोयनानगर पोस्टे. पोकॉ. १८७७

एस. व्ही. सुर्यवंशी, नेम जिविशा, (संलग्न कोयनानगर पोस्टे), तसेच श्री कवठेकर, पोलीस निरीक्षक, पाटण पोस्टे व

टीम यांच्या पथकाने देखील आरोपीतांना पकडण्यास मदत केली असून सदरची उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल पोलीस

अधीक्षक, सातारा यांनी विशेष अभिनंदन केलेले आहे.


Post a Comment

0 Comments