सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
खोट्या सह्या करून संमतीपत्राची नोटरी तयार केल्या प्रकरणी रावडी खुर्द येथील तिघांच्यावर गुन्हा दाखल.
दि.13/03/2024 ते दि.10/12/2023 रोजी सकाळी 10.30 वा. चे सुमारास मारवाडपेठ, फलटण, ता फलटण, जि. सातारा येथे आरोपी 1) केशव रामचंद्र शिंदे (मयत), 2) किमया केशव शिंदे,वय 22 वर्षे 3) हेमा केशव शिंदे, सर्व रा. रावडी खुर्द, ता. फलटण.यांनी खोट्या सह्या करून संमतीपत्राची नोटरी तयार करून माझी फसवणूक केल्याची फिर्याद श्रीमती लक्ष्मी महादेव शिंदे, वय 40 वर्षे, व्यवसाय घरकाम, मुळ रा.रावडी खु., ता.फलटण, जि.सातारा सध्या रा. मिरेवाडी ता.फलटण जि.सातारा.यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रावडी खुर्द, ता, फलटण, जि. सातारा येथे पुतणी नामे किमया केशव शिंदे,वय 22 वर्षे हिने स्वत: चे नावे शंभर रुपयेचा स्टँम्प पेपर घेवुन त्यावरती मारवाडपेठ, फलटण येथे फिर्यादी मुंबई येथे असताना फिर्यदीची खोटी सही करुन या खोट्या सह्यांच्या संमतीपत्राची नोटरी तयार करुन केशव रामचंद्र शिंदे (मयत) व किमया केशव शिंदे, वय 22 वर्षे, दोन्ही रा. रावडी खुर्द, ता. फलटण यांनी संगनमताने सदरची नोटरी माळेगाव साखर कारखाना येथे देवुन फिर्यादीची तसेच माळेगाव साखर कारखान्याची फसवणुक केलेली आहे. तसेच दिर केशव शिंदे (मयत) यांना सदर क्षेत्रातील ऊस फिर्यादीचे नावावर न पाठविता, फिर्यादिस कोणतीही कल्पना न देता आरोपीचं नावावर का पाठविला, असे विचारले असता, मुलगी लतिका हीस दिर केशव शिंदे, जाऊ हेमा केशव शिंदे, पुतणी किमया केशव शिंदे यांनी शिवीगाळ, दमदाटी करुन "आधी बापाला घेवुन ये, मग जमिनीचा हिस्सा देतो" अशी धमकी दिली. अशी फिर्याद श्रीमती लक्ष्मी महादेव शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असुन गुरनं व कलम- 457/2024 भा.द.वि.सं. कलम 420, 467,468, 504,506,34 प्रमाणे आरोपींच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील पोउपनि. एस.आर. शिंदे हे करीत आहेत.
Post a Comment
0 Comments