Type Here to Get Search Results !

फलटण ग्रामीण पोलिसांनी जिवदान देणाऱ्या दोन युवकांचा केला सन्मान.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ वैभव जगताप 

फलटण ग्रामीण पोलिसांनी जिवदान देणाऱ्या दोन युवकांचा केला सन्मान. 



दि. 1 सप्टेंबर वेळ  रात्री 12 वाजताची अमावस्या असल्याने सर्वत्र काळोख दाटलेला असताना स्विफ्ट कार Mh12 TV 6197 ही सुरवडी करून साखरवाडी कडे निरा उजवा केनॉल  वरून जात असताना त्या ठिकाणी कॅनॉल मध्ये गेली 

त्याचवेळी नशीब बलवत्तर म्हणून त्या ठिकाणाजवळ दोन युवक नितीन जाधव व अभिजित खोमणे रा. १५ नंबर फाटा सुरवडी यांच्या ही गोष्ट लक्षात आली .त्यांनी जीवाची परवा न करता त्या दोघींना कॅनॉलच्या पाण्यामध्ये जाऊन गाडीचे दरवाजे फोडून  काढले. आणि त्या दोघींचा जीव वाचवला खरंतर वेळ रात्रीची असल्यामुळे केवळ त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून परमेश्वर रूपात हे दोघे त्या दोन महिलांचा व एका पुरुषाचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी कुठल्याही प्रकारची बघ्याची भूमिका न घेता जीवावर उदार होऊन त्यांचे प्राण वाचवले या दोन्ही युवकांचा सत्कार करावा असे माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांनी आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये साखरवाडी दुरुक्षेत्र या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व सहाय्यक पोलीस फौजदार हजारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात आला 

खरंतर प्रत्येक नागरिक हा साध्या कपड्यातील पोलीस आहे प्रत्येकाने या प्रकारे जर आपले कर्तव्य निभावले तर खूप मोठे पुण्य पदरात पडते आणि हीच खरी निरपेक्ष केलेली समाजसेवा आहे या दोन महीलेंचा व एका पुरुषाचा या दोघांनी केलेल्या कामामुळे त्यांचा पुनर्जन्मच झालेला आहे सातारा पोलिसांतर्फे त्यांना त्रिवार वंदन.

Post a Comment

0 Comments