सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
शिक्षक दिनी लोकनेते प्रल्हादरावजी साळुंखे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने साखरवाडी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचा सन्मान...!
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.या दिवसाचे औचित्य साधून लोकनेते प्रल्हादरावजी साळुंखे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने साखरवाडी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते श्रीफळ , पुष्प , पेन व स्वीट बॉक्स देवून सन्मानित करण्यात आले.प्रारंभी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री कौशल भोसले , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ऊर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे , प्रतिष्ठान चे सचिव तथा विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री संदीप चांगण , बालवाडी प्रमुख सौ विद्या चांदगुडे , तसेच संस्थेच्या बालवाडी , प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री महेश साळुंखे पाटील व सचिव श्री हरिदास सावंत यांनी केले. याच कार्यक्रमात सुरवडी येथील नीरा उजव्या कालव्यात मध्यरात्री चार चाकी वाहन कोसळून खोल पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघी मायलेकी व गाडीच्या ड्रायव्हर चे प्राण अत्यंत धाडसाने वाचवणाऱ्या सूरवडी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री नितीन शिवाजी जाधव व अभिजीत खोमणे यांना माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून विशेष सन्मान करण्यात आला.
Post a Comment
0 Comments