Type Here to Get Search Results !

खुंटे सहकारी विकास सेवा सोसायटी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

खुंटे सहकारी विकास सेवा सोसायटी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित.


सहकारातून समृद्धीकडे या ब्रीद वाक्याला साजेल अशी खुंटे सहकारी विकास सेवा सोसायटीची कामगिरी..

सहकार क्षेत्रात तालुक्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खुंटे विकास सेवा सोसायटी लिमिटेड खुंटे या संस्थेस तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हा पुरस्कार सोसायटीचे चेअरमन श्री अविनाश (काका) पांडुरंग खलाटे, व्हाईस चेअरमन सौ.छाया त्रिंबक खलाटे व पंच कमिटी सदस्य तसेच सचिव श्री रघुनाथ जाधव यांना महाराष्ट्र राज्याचे मा.विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,बँकेचे चेअरमन व खासदार श्री नितीन काका पाटील ,मा. सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील , आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे साहेब यांच्या हस्ते उत्कृष्ट सोसायटी म्हणून गौरवण्यात आले.

Post a Comment

0 Comments