Type Here to Get Search Results !

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाचा १०वी चा निकाल ९६.१३%-कु.कस्तुरी भोसले विद्यालयात सर्वप्रथम.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

 साखरवाडी/ वैभव जगताप 

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाचा १०वी चा निकाल ९६.१३%-कु.कस्तुरी भोसले विद्यालयात सर्वप्रथम.











         मार्च २०२४ मध्ये झालेल्या इयत्ता १०वी च्याशालांत परीक्षेत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाचा निकाल ९६.१३% लागला असून कुमारी कस्तुरी मच्छिंद्र भोसले ही विद्यार्थिनी ९४.८०% गुण मिळवून विद्यालयात सर्वप्रथम आली आहे. 

       विद्यालयातील कु. सूर्यवंशी तनिष्का रवींद्र व कु. भोसले समिक्षा संदीप या दोघींनी ९४.६०% गुण मिळवून दुसरा, व कु. भोसले चैतन्य संतोष याने ९३.८०% गुण मिळवून तिसरा क्रमांक संपादन केला आहे.

       संस्कृत या विषयात कु. भोसले कस्तुरी मच्छिंद्र व कु. भोसले चैतन्य संतोष यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.

        तांत्रिक विभागात कु. फडतरे श्रीराज दत्तात्रय आणि कु. भुजबळ श्रवण सचिन या दोन विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. 

          विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा. श्री. प्रल्हादरावजी साळुंखे-पाटील , संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. धनंजय दादा साळुंखे-पाटील, तसेच संचालक मा. श्री. राजेंद्रजी शेवाळे, मा. श्री. राजेंद्रजी भोसले, मा. श्री. कौशल भैय्या भोसले, संस्था सचिव तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिलाताई जगदाळे, पर्यवेक्षक श्री. तुळशीदास बागडे, संस्थेच्या सर्व विभागातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर बंधू भगिनींनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments