Type Here to Get Search Results !

लोणंद येथील टाईल्सच्या दुकानातुन १,४७,०००/-रु चोरी करणाऱ्या आरोपींना लोणंद पोलिसांनी १२ तासाच्या आत गेले जेरबंद

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

लोणंद येथील टाईल्सच्या दुकानातुन १,४७,०००/-रु चोरी करणाऱ्या आरोपींना लोणंद पोलिसांनी १२ तासाच्या आत गेले जेरबंद.



दिनांक ०२/०७/२०२५ रोजी फिर्यादी कपील धन्यकुमार जाधव रा. लोणंद ता. खंडाळा जि.सातारा

यांनी समक्ष लोणंद पोलीस ठाणेत येवुन तक्रार दिली की, त्यांचे सम्राट स्टाईल या दुकानातील ड्राव्हरमधुन

कोणीतरी अज्ञात आरोपीने रोख रक्कम १,४७,०००/- हे चोरी केले आहेत. अशी फिर्याद दिलेने लोणंद पोलीस

ठाणेत गुन्हा रजि.क्र. २४७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षत घेऊन मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री. तुषार दोशी सो, मा.

अप्पर पोलीस अधिक्षक सो, सातारा वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो

यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सुशिल भोसले सहा. पोलीस निरिक्षक व

त्यांचे पथकाने सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली असता पोलीसांनी गोपनीय

माहीती काढुन सदर गुन्हा हा देऊर ता. कोरेगाव येथील  १) हसीना दस्तगिर सय्यद वय ३२ वर्षे

२) दस्तगिर मुबारक सय्यद वय ४१ वर्षे दोन्ही रा. बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे, देऊर ता.

कोरेगाव जि. सातारा रहीवाशी पती पत्नी यांनी केला असलेची खात्री

केली व तात्काळ पोलीस पथकाने यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन अटक केली. सदर दोन्ही आरोपींना

मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी सो, खंडाळा यांचे समक्ष हजर करुन त्यांची दोन दिवस पोलीस कोठडी घेण्यात

आली. पोलीस कोठडीत असताना सदर दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन आरोपींकडुन गुन्हयात चोरी केलेला

संपुर्ण मुददेमाल रोख रक्कम १,४७,०००/- रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक साो सातारा तुषार दोशी सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक

साो. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद

पोलीस स्टेशनचे श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोहवा संतोष नाळे, पो.ना बापुराव

मदने, पो. कॉ. अंकुश कोळेकर, अमोल जाधव, विठठल काळे, अमीर जाधव महीला पो.कॉ. अश्विनी माने यांनी

सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन पोलीस हवालदार संतोष नाळे हे पुढील तपास करीत आहेत.

मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी विषेश अभिनंदन केले आहे.






Post a Comment

0 Comments