सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा उत्साहात.
ता.फलटण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे मुख्याध्यापक, शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शना खाली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वारकरी वेशभूषा धारण करून या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांकडून माऊलींच्या नावाचा गजर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी विविध वाद्य वाजवीत व विद्यार्थिनींनी पारंपारिक महिलांचे खेळ सादर करत या अपूर्व पालखी सोहळ्यात तडवळे विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाने सहभाग नोंदवला. अतिशय उल्हासाच्या वातावरणात पालखी शाळेच्या प्रांगणातून निघाली . तडवळे गावच्या प्रमुख मार्गातुन प्रदक्षणा करून माऊलींची पालखी पुन्हा शाळेत दाखल झाली. शाळेतील शिक्षक श्री. बांडे सर यांनी विद्यार्थ्यांना संपुर्ण मार्गदर्शन केले. या पालखी सोहळ्यात मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Post a Comment
0 Comments