सह्याद्री निर्भिड न्यूज
महाबळेश्वर/राहुल शेलार
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर.
महाबळेश्वर येथील सरपंच पदासाठीच्या आरक्षण सोडत शुक्रवार दि ४ रोजी सकाळी ११.०० वाजता नियंत्रण अधिकारी मा. श्री अभिषेक देशमुख, उपजिल्हाधिकारी सातारा, महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्के यांचे उपस्थितीमध्ये खादी ग्रामोद्योग मंडळ मध संचलनालय सभागृह महाबळेश्वर येथे पार पाडण्यात आली. मा. जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्र. साशा / ग्राप- 2 / कावि 181/2025 दि.20/06/2025 अन्वये मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2 अ च्या पोट नियम (4) नुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे कामी तहसिलदार यांना प्राधिकृत केले असून ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत दि.04/07/2025 रोजी करणेचे निर्देश देणेत आलेले होते .
मा. जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेशानुसार महाबळेश्वर तालुक्यातील एकुण 79 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांची पदे अनु. जाती साठी एकूण 06 (3 महिला, 3 खुला) अनु. जमाती साठी एकुण 05 (3 महिला, 2 खुला), ना. मा. प्र साठी एकूण 21 (11 महिला, 10 खुला). सर्वसाधारण साठी एकुण 47 (24 महिला+ 23 खुला इतकी पदे मंजूर करणेत आलेली असून श्री सचिन मस्के, तहसिलदार महाबळेश्वर यांनी महाबळेश्वर तालुक्यातील एकुण 79 ग्रामपंचायतीमध्ये सोडती द्वारे खालील प्रमाणे सरपंच पदे निश्चित करून जाहीर केले.
अनुसुचित जाती-
१. अनु. जाती महिला -शिंदी, गोडवली, वानवली तर्फ सोळशी (एकूण-03)
२. अनु. जाती- वलवण, रेणोशी, गुरेघर (एकूण-03)
अनुसुचित जमाती
१.अनुसुचित जमाती महिला. येर्णेबु, माचुतर, भोसे (एकूण -03),
२. अनुसुचित जमाती - आमशी व गोरोशी (एकूण २)
नागरिकांचा मागास प्रवर्ग -
१. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - पिपरी तर्फ तांव, मेटगुताड, अहिर, आकल्पे, एरंडल, रुळे, बिरवाडी, तळदेव, आरव, जावली, रामेघर (एकूण 11)
२. नागरिकांचा मागास प्रवर्ग - दांडेघर, झांजवड, कुमठे, कुंभरोशी, पाली तर्फ आटेगाव, कुरोशी, वेंगळे, दानवली, वेळापुर, चतुरबेट, (एकूण 10 )
सर्वसाधारण
१. सर्वसाधारण महिला - भेकवली, कासवंड, नाकिंदा, आचली, शिरवली, वाळणे, कळमगाव, दाभेदाभेकर, सौंदरी, मांघर, खरोशी, पांगारी, दाभेदाभेमोहन, खिगर, क्षेत्र महाबळेश्वर, मोळेश्वर, घावरी, पारुट, दुधगाव, आंब्रळ, भिलार, कोट्रोशी, वारसोळीदेव, तायघाट. (एकूण 24 )
२. सर्वसाधारण - मेटतळे, हरचंदी, सोनाट, देवळी, गावढोशी, अवकाळी, मोरणी, उचाट, गोगवे, देवसरे, निवळी, भिमनगर, खांबील चोरगे, हातलोट, सालोशी, चिखली, लाखवड, पर्वत तर्फ वाघवले, बिरमणी, लामज, राजपुरी, पारपार, उंबरी (एकूण 23 ) असे महाबळेश्वर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन जाहीर करणेत आले.
सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची प्रस्तावना श्री दिपक सोनावले निवासी नायब तहसिलदार यांनी केली. सर्व सरपंच आरक्षणाचे कामकाज श्री विनोद सावंत महसूल नायब तहसिलदार, श्रीमती जहिदा शेख निवडणूक नायब तहसिलदार, तसेच श्री हेमंत सुळ सहा. महसूल अधिकारी, श्री दिपक चव्हाण सहा. महसूल अधिकारी, श्री केशव नांदेडकर महसूल सहाय्यक व इतर सर्व महसूल कर्मचारी यांनी कामकाज पाहीले.
आयोजित सरपंच आरक्षण कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ, सरपंच, राजकीय पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम अधिकारी उपस्थित होते. सरपंच आरक्षण निश्चितीनंतर सर्वांचे आभार मानून सभा संपलेचे जाहीर केले.
Post a Comment
0 Comments