Type Here to Get Search Results !

सातारा पोलिसांनी सातत्याने गुन्हे करणाऱ्या दोन आरोपींना केले दोन वर्षाकरिता तडीपार.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

सातारा पोलिसांनी सातत्याने गुन्हे करणाऱ्या दोन आरोपींना केले दोन वर्षाकरिता तडीपार.


 (सातारा जिल्हयातील सातारा शहर परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे

करणाऱ्या टोळीतील ०२ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार)

सातारा जिल्हयामधील सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे

गुन्हे करणारे सराईत टोळी प्रमुख १) अविनाश राजाराम भिसे वय २५ वर्षे रा. प्रतापसिंहनगर ता. जि. सातारा तसेच

टोळी सदस्य २) रोहित जितेंद्र भोसले वय २२ वर्षे रा. प्रतापसिंहनगर ता. जि. सातारा यांचेवर जबरी चोरी करणे,

घरफोडी चोरी करणे, चोरी करणे, यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी

अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे

संपुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा

यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा

विभाग सातारा यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई

करुन ही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर

परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा तालुका

परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधुन

कारवाई करणेची मागणी होत होती.

मा.तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख १) अविनाश

राजाराम भिसे वय २५ वर्षे, तसेच टोळी सदस्य २) रोहित जितेंद्र भोसले वय २२ वर्षे, दोन्ही रा. प्रतापसिंहनगर

ता.जि.सातारा यांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा

जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी काळात सातारा जिल्हयातील

सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक

सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो. कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर

पोलीस ठाणेचे पो.हवा दिपक इंगवले, संदीप पवार पोकॉ अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments