सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज साखरवाडी एच. एस. सी. वोकेशनल विभागाची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा उत्साहात.
सोमवार दि. ३०/०६/२०२५ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज एच एस सी वोकेशनल विभाग साखरवाडी येथे प्रशालेचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शना खाली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वारकरी वेशभूषा धारण करून या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांकडून माऊलींच्या नावाचा गजर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी विविध वाद्य वाजवीत व विद्यार्थिनींनी पारंपारिक महिलांचे खेळ सादर करत या अपूर्व पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. अतिशय उल्हासाच्या वातावरणात पालखी शाळेच्या प्रांगणातून निघाली . साखरवाडीच्या बाजारपेठेला प्रदक्षणा करून माऊलींची पालखी पुन्हा प्रशालेत दाखल झाली. प्रशालीतील शिक्षक श्री टिळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना भोजन दिले. या पालखी सोहळ्यात प्राचार्य ,सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले.
Post a Comment
0 Comments