सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्यु. कॉलेज साखरवाडी, इ.५वी.तील विद्यार्थ्यांची एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल सांगली महाराष्ट्र या ठिकाणी निवड.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सरदार वल्लभभाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज एच एस सी वोकेशनल विभाग , साखरवाडी. या प्रशालेतील इयत्ता पाचवी या वर्गामध्ये शिकत असणारा विद्यार्थी कु. आदर्श धनंजय गजफोडे याने ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2024/2025 ही परीक्षा दिली व 300 पैकी 259 मार्क्स संपादन केल्याने त्याची एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल सांगली महाराष्ट्र या ठिकाणी निवड झाली. याप्रसंगी
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , स्कूल कमिटीचे चेअरमन श्री भोजराज नाईक निंबाळकर , व्हाईस चेअरमन श्री राजाराम बबनसो नाईक निंबाळकर व सदस्य , प्रशासन अधिकारी श्री अरविंद सखाराम निकम , प्राचार्य , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments