Type Here to Get Search Results !

शाहुपुरी पोलिसांच्या कडून १०.५ तोळे वजनाचे ९,६०,०००-/ रु. किंमतीचे चोरीचे सोने हस्तगत.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

शाहुपुरी पोलिसांच्या कडून १०.५ तोळे वजनाचे ९,६०,०००-/ रु.किंमतीचे चोरीचे सोने हस्तगत.


शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चोरीचा गुन्हा उघड करुन १०.५ तोळे

वजनाचे ९,६०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत

शाहुपूरी पोलीस ठाणे मध्ये दि.१७/०५/२०२५ रोजी सोन्याच्या दागिन्याची चोरीची तक्रार प्राप्त

झालेली होती. त्याप्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.१४९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०६

प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी,

मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले

यांनी पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांना सदरचा गुन्हा उघकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या

होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व

पोलीस अंमलदार यांना सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेवुन तात्काळ अटक करणे

बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

दि.१७/०५/२०२५ रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे

सदर गुन्ह्याच्या घटनास्थळावर जावुन फिर्यादी यांचेकडुन घटनेची माहिती घेतली असता घरामध्ये सिमा

संजय कोकरे ही महिला घरातील काम करणेस गेले सहा महिन्यापासुन होती. दि.१७/०५/२०२५ रोजी

घटनेच्या दिवशी फिर्यादी यांच्या घरी घरातील काम करणेकरीता सिमा कोकरे ही आली होती. या

व्यतीरीक्त फिर्यादी यांच्या घरी कोणी आलेले नसुन सिमा कोकरे हीच्यावर अधिकचा संशय असल्याने

तिला पोलीस ठाणेस बोलावुन घेवुन तिच्याकडे चौकशी केली असता सुरवातीस तीने उडवाउडवीची

उत्तरे दिली. त्यानंतर तीला विश्वासात घेवुन तीच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विचारपुस केली असता

तीने नमुद गुन्ह्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपी सिमा संजय कोकरे वय. ४२ वर्षे रा. देशपांडे मारुती मंदिरा शेजारी चिंतामणी सोसायटी शाहुपुरी सातारा

ता.जि.सातारा

ताब्यात घेवुन तिच्याकडुन गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले १०.५ तोळे वजनाचे ९,६०,०००/- रुपये किंमतीचे

सोन्याचे दागिने हस्तगत करुन सोन्याचे दागिने चोरीचा गुन्हा उघकीस आणला आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली

कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे

मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. ढेरे व पोलीस अंमलदार सुरेश घोडके,

मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल

सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे व महिला पोलीस अंमलदार माधुरी शिंदे, कोमल

पवार, गायत्री गुरव यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments