सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानकन्यांकडून धुमाळवाडी येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धुमाळवाडी येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी मा. श्री. सचिन जाधव, सरपंच मा. सौ रूपाली जाधव, मुख्याध्यापिका मा. सौ स्मिता अडसूळ, प्रगतशील शेतकरी अंकुश गुंजवटे व शिवाजी भोसले, शिक्षिका सौ.सत्वशीला फडतरे, सौ. अर्चना केंजळे, सौ. हेमा ठोंबरे, शिक्षक मा.श्री. अमोल सोनवणे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत वृक्षदिंडी काढण्यात आली व नंतर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी मा.श्री सचिन जाधव यांनी वाढते प्रदूषण व त्यासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले. वड, आंबा, शेवगा, चिंच इत्यादी झाडे लावण्यात आली. उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्हि. लेंभे, प्रा. डॉ.अश्विनी
अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या आढाव पायल, बनकर नेहा, चव्हाण दिव्या, शिंदे दिशीता, सोनवलकर गौरी, तांदळे सृष्टी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
Post a Comment
0 Comments