Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला उत्तराखंड येथील पर्यटकांशी संवाद.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला उत्तराखंड येथील पर्यटकांशी संवाद.



सातारा दि. 2 : उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकेले आहेत. या अडलेल्या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.


उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे  दि. ३० जून रोजी सिलाईबंद या ठिकाणी अतिवृष्टिमुळे चारधाम रस्ता वाहून गेला असल्याने महाराष्ट्रातील सर्वसाधारणपणे 150 पर्यटक अडकले आहेत. झांझवड ता. महाबळेश्वर येथील 6 पर्यटकांचा यामध्ये समावेश असून ते सध्या बडकोट येथे सुखरुप असल्याची माहिती घेतली. 

यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झांझवड ता. महाबळेश्वर येथील पर्यटक आकाश जाधव यांच्याशीही भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. तेथील परिस्थिती बद्दल माहिती घेतली. प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल जाणून घेतले. काही अडचण असल्यास त्वरीत संपर्क साधण्याबाबत सांगितले. महाराष्ट्रतील पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्याशीही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षीत महाराष्ट्रात पाठविले जाईल, असे सांगितले. उत्तराखंड येथील स्थानिक प्रशासन सहकार्य करीत असून महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.


Post a Comment

0 Comments