सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या संकल्पनेतून सी.यु.जी. प्रणालीची निर्मिती..!
सातारा जिल्हयातील नागरिकांना पोलीस विभागाशी संबधित काही सुचना, माहीती, तक्रारी
हया २४ x ७ काळात तात्काळ देता याव्यात या करीता जिल्हा पोलीस दलामध्ये सी. यु. जी.
(Common User Group) ची संकल्पना मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी
अंमलात आणली आहे. जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी
अधीकारी व सर्व शाखांचे प्रमुख यांना विशिष्ट मोबाईल नंबर व मोबाईल हॅण्डसेट पुरविण्यात आलेले
आहेत. त्या अनुषंगाने सदर सी. यु. जी. (Common User Group) नंबरचा लोकार्पण सोहळा व
नवीन मोबाईल हॅण्डसेटचे वाटप आज दिनांक १९/०५/२०२५ रोजी सातारा जिल्हयाचे मा. पालकमंत्री
श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई पर्यटन, खणीकर्म, माजी सैनीक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या
हस्ते करण्यात आले. सदर लोकार्पण सोहळयास सातारा जिल्हयातील मान्यवर मा. श्रीमंत
छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. मकरंद जाधव-पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र
राज्य, तसेच जिल्हयातील लोकप्रतिनिधी आमदार व खासदार, मा. जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील
(भा.प्र.से.) व मा. श्रीमती याशनी नागराजन (भा.प्र.से.) मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर
पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व अधिकारी हे उपस्थित होते.
जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, शाखांशी संबधित काही सुचना, तक्रारी अथवा महत्वाची
माहीती नागरिकांना दयावयाची असल्यास ते या सी. यु. जी. (Common User Group) च्या
मोबाईल नंबरवर त्या पोलीस स्टेशन व शाखांना sms व whatsapp message व्दारे देवु
शकतील. सदरची सेवा ही २४ x ७ कालावधीत उपलब्ध आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते
की, आपण आपल्या सुचना व तक्रारी, माहीती विशेषत: whatsapp message व्दारे दिले मोबाईल
नंबर वर द्याव्यात. सर्व सामान्य जनतेशी संपर्क वाढवुन वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे व अप्रिय
घटना टाळणे या उददेशाने नागरिकांच्या सुविधे करीता हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
सदरची सेवा ही पुर्णत: शासकिय कामकाजासाठी उपलब्ध आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
Post a Comment
0 Comments