Type Here to Get Search Results !

संपुर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली चे आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

संपुर्ण सातारा जिल्ह्यामध्ये उद्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली चे आयोजन.


मा. श्री. शंभुराज देसाई साहेब, पालकमंत्री सातारा जिल्हा यांनी दिलेल्या सुचनेनुसार संपूर्ण सातारा

जिल्ह्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दि.२०/०५/२०२५ रोजी फलटण तालुक्यातून 'ऑपरेशन सिंदूर'ला समर्थन देणेकामी व आपल्या सैनिकांना पाठबळ देण्यासाठी फलटण शहरामध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने सकाळी ९.०० वा. तहसिल कार्यालय, फलटण येथून तिरंगा रॅलीची सुरवात होईल.

रॅलीचा मार्ग-तहसिल कार्यालय परिसर येथून सुरवात -> महात्मा फुले चौक -> महात्मा गांधी पुतळा (गजाननचौक) -> उमाजी नाईक चौक - महावीर स्तंभ -> डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - > छत्रपती शिवाजी महाराज चौक -> डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - महावीर स्तंभ -> डेक्कन चौक - > महात्मा फुले चौक-> तहसिल कार्यालय परिसर या पद्धतीने रॅलीचा मार्ग असून सदर तिरंगा रॅलीस फलटण शहरातील व फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.


Post a Comment

0 Comments