सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी हरिदास सावंत (सर)
श्री. ग. वि .भोसले सर प्रतिष्ठान व जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन - साखरवाडी आयोजित गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न.
साखरवाडी येथील श्री ग. वि. भोसले सर प्रतिष्ठान व जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन ने आयोजित केलेला गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.साखरवाडी बाजारपेठेतील श्री भवानीमाता मंदिरात आयोजित या कार्यक्रमात साखरवाडी परिसरातील इयत्ता १० वी / १२ वी मधील उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या तसेच विविध शासकीय सेवा स्पर्धा परिक्षांमधून गौरवास्पद यश मिळवून शासकीय सेवेत प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना मान्यवरांच्या शुभहस्ते शाल , श्रीफळ , पुष्प आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.भारतीय सैन्यात व महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया शुगर डिवीजन च्या टेक्निकल युनिट चे जनरल मॅनेजर माननीय श्री अमोल पाल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या समारंभात श्री ग. वि .भोसले सर फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भोसले , उपाध्यक्ष श्री संजय भोसले , फाऊंडेशन चे सचिव तथा जायंटस् वेल्फेअर चे अध्यक्ष श्री हरिदास सावंत सर , फलटण जायंटस् चे पदाधिकारी सर्वस्वी श्री शांताराम आवटे सर , शिरीष शहा , दिपक दोशी, साखरवाडी मधील दोन्ही संघटनांचे पदाधिकारी सर्वस्वी श्री ज्ञानदेव भोसले , अरविंद भोसले , प्रशांत रणवरे , विनोद जाधव , हरिष गायकवाड , तानाजी जगदाळे त्याचप्रमाणे परिसरातील श्री के . के .भोसले , श्री डी .के.पवार , श्री संपतराव माडकर , महेश भोसले , दिलुकाका भोसले , गोरख भोसले , सुभाष बोंद्रे , विजय बोंद्रे , रावसाहेब वैद्य , ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री खानविलकर डॉक्टर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.श्री हरिदास सावंत सरांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत करून दोन्ही संघटनांच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला. श्री पाल साहेब , डी. के. पवार , श्री सचिन भोसले , श्री सुभाष बोंद्रे , डॉक्टर खानविलकर इत्यादींनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. आभार श्री सुधीर भोसले यांनी मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन चौगुले सरांनी केले.
Post a Comment
0 Comments