Type Here to Get Search Results !

श्री ग. वि.भोसले सर प्रतिष्ठान व जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/हरिदास सावंत (सर) 

श्री.ग. वि.भोसले सर प्रतिष्ठान व जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन  आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ.



श्री ग. वि.भोसले सर प्रतिष्ठान - साखरवाडी व जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन - साखरवाडी आयोजित साखरवाडी परिसरातील एस . एस. सी. , एच. एस. सी. व शासकीय स्पर्धा परीक्षांमधून उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या गुनिजनांचा गुणगौरव समारंभ  रविवार दिनांक १८/०५/२०२५ रोजी साखरवाडी येथे आयोजित : शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत संपन्न असलेल्या साखरवाडी परिसरातील इयत्ता दहावी , इयत्ता बारावी आणि विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या गुनिजनांचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक १८/०५/२०२५ रोजी श्री ग. वि. भोसले सर प्रतिष्ठान - साखरवाडी आणि जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन - साखरवाडी यांचे संयुक्त विद्यमाने श्री भवानीमाता मंदिरात आयोजित केला असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भोसले , उपाध्यक्ष श्री संजय भोसले व सचिव श्री हरिदास सावंत यांनी कळवले आहे.दोन्ही प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments