सह्याद्री निर्भिड न्यूज
संपादक -वैभव जगताप
सातारा तालुक्यातील ३ आरोपींना सातारा पोलीसांनी केले २ वर्षाकरिता तडीपार.
सातारा जिल्हयातील सातारा तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील ०३ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार
सातारा जिल्हयामधील सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे
गुन्हे करणारे सराईत टोळी प्रमुख १) अकिब कासिम नंदगळकर, वय ३० वर्षे रा. निसर्ग कॉलनी, निशीगंधा अपार्टमेंट,
दुसरा मजला बुधवार नाका शाहुपुरी सातारा तसेच टोळी सदस्य २. शाहरुख शमशुद्दीन पठाण, वय २५ वर्षे
रा. शनिवार पेठ सातारा ता. जि. सातारा ३. शाहरुख नौशाद खान, वय ३० वर्षे, रा. नवजीवन कॉलनी, सोमवार
पेठ,सातारा ता.जि.सातारा यांचे टोळीवर जबरी चोरी करणे, चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखा
करणे, घरफोडी करणे, राहते घर, वाहतुकीची साधने, उपासना स्थळ इत्यादीतील चोरी करणे असे अनेक गुन्हे
दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांनी सदर
टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्ह्यातुन तसेच पुणे जिल्ह्यातील भोर,
बारामती, पुरंदर तालुक्यातुन, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा तालुक्यातुन सोलापुर जिल्ह्यातील माळशि
तालुक्यातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे
सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग
सातारा यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई
करुन ही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर
परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा तालुका
परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक
कारवाई करणेची मागणी होत होती.
मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख १) अकिब
कासिम नंदगळकर, वय ३० वर्षे २. शाहरुख शमशुद्दीन पठाण, वय २५ वर्षे ३. शाहरुख नौशाद खान, वय ३० वर्षे, यांची
सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्ह्यातुन तसेच पुणे
जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातुन, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा तालुक्यातुन सोलापुर
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३९ उपद्रवी टोळयांमधील १३४ इसमांना, मपोकाक५६ प्रमाणे
३८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १७६ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात
आली असुन सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत
गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा
सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा
सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पो. हवा दिपक इंगवले, संदीप पवार, अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर
केला आहे.
Post a Comment
0 Comments