Type Here to Get Search Results !

महात्मा फुले गौरव पुरस्काराने कृषि सेवारत्न सचिन जाधव यांचा सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

महात्मा फुले गौरव पुरस्काराने कृषि सेवारत्न  सचिन जाधव यांचा सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित.


फलटण -महात्मा फुले विचार अभियानाच्या वतीने कृषी सेवा रत्न श्री सचिन जाधव  यांना महात्मा फुले गौरव पुरस्कार 2025  चा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले फलटण येथील उपळेकर मंदिर येथे झालेल्या महात्मा फुले गुणगौरव कार्यक्रमध्ये, लेखक व साहित्यक  सर्जाकार सुरेश शिंदे,  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच अध्यक्ष तुकाराम कोकाटे यांच्या हस्ते कृषि सेवारत्न सचिन जाधव यांचा महात्मा फुले गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला 

यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ,सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव साहित्य  सर्जाकार सुरेश शिंदे, पुण्यश्लोक आईहिल्यादेवी  त्रीशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सूळ, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव,या मान्यवराच्या उपस्थित देण्यात आला 

 सचिन जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना महात्मा फुले गौरव पुरस्कार सन्मान करण्यात आला आहे

 सन्मान युवा मनाचा  गौरव फुले विचारांचा या प्रमाणे काही कर्तुत्वान व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला 

 महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा कृषि सेवा रत्न पुरस्कार देऊन राज्यपालच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलेले आहेत तसेच उत्कृष्ट कामा बद्दल महाराष्ट्र राज्य कृषि विभागाच्या वतीने सन्मान पत्र देऊन गुण गौरव करण्यात आलेले आहे

सातारा जिल्ह्यातील पहिले कृषी सेवा रत्न पुरस्कार  प्राप्त  आहेत 

 महाराष्ट्रात राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी  घोषित करण्यासाठी त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे

Post a Comment

0 Comments