Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर तालुक्यातील रेशन दुकानदाराकडून ग्राहकांची फसवणूक..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

महाबळेश्वर/ राहुल शेलार

महाबळेश्वर तालुक्यातील रेशन दुकानदाराकडून ग्राहकांची फसवणूक..



महाबळेश्वर तालुक्यातील आचली,येरणे,देवसरे,मजंरेवाडी येथील 

गरीब व मध्यमवर्गीय नागरिक सरकारी दराने रास्त भाव धान्य दुकानातून धान्य घेऊन आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करतात. प्रत्यक्षात मात्र रेशन दुकानदार अशा ग्राहकांची फसवणूक करतात. त्यांना त्यांचा हक्काचे रेशन पूर्ण देत नाही. 

 त्यातही काहींना वाटून स्टॉक संपल्याचे बहाणे करण्यात येते. रेशन दिल्यानंतर कार्डधारकांकडून थम मशिनमध्ये अंगठा लावण्यात येतो. या मशिनमध्ये केवळ अंगठा लावल्या जात असल्याचे नाट्य करण्यात येते. गरिबांच्या हक्काचे धान्य दुकानदार बाहेर बाजारपेठेत विकतात.  या सर्व  प्रकाराची निष्पक्षपणे चौकशी करुन भ्रष्ट राशन दुकानदार याचां रेशनिंग परवाना रद्द करण्यात यावा. अन्यथा शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन तालुकाप्रमुख अभिषेक शिंदे यांनी तहसीलदार कार्यालयात दिले.

Post a Comment

0 Comments