सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
महाराष्ट्र व परराज्यात घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केले जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी.
गुजरात, कर्नाटक, तेलंगना व महाराष्ट्रातील सांगली, पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापुर जिल्हयात नाव बदलुन अट्टल घरफोडी करणा-या आरोपी व त्याचा साथीदारास जेरबंद
१२० ग्रॅम २ मीली सोन्याचे दागीने सह एकुण ८,८२,५००/- रू मुद्देमाल जप्त.
मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध
घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्हयाच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस
| अधीकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे
शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करणेबाबत आदेशीत
केले होते.
सपोनि श्री विशाल वायकर त्यांचे पथकासह अकलुज व पंढरपुर उपविभागात मालाविषयी घडलेल्या गुन्हयातील
आरोपीतांचा शोध घेत असताना, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषण आधारे आरोपी निष्पण करण्यात आले, सदर
गुन्हयातील आरोपीतांचा गोपणीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, नातेपुते पोलीस ठाणे गुरंन १०५ / २०२५ भा.
न्यासं क. ३०५ (अ), ३३१ (४) या गुन्हयातील आरोपी हा मंगळवेढा येथील सांगोला ते सोलापुर महामार्गाच्या ब्रीज खाली
टोल नाका येथे साथीदासह येणार आहे याची खात्री पटल्यावर साफळा लावण्यात आला, सदर बातमी प्रमाणे सपोनि
विशाल वायकर व त्यांचे पथक मंगळवेढा येथे पोहोचले. बातमी प्रमाणे नमुद आरोपीस पथकाने सापळा रचुन ताब्यात घेतले.
आरोपीत यांचे कडे तपास करता सदरचा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केल्याची कबुली दिली. सपोनि विशाल वायकर व त्यांचे
पथकाने आरोपीताकडे अधिक कौशल्यपुणे तपास केले असता, सदर आरोपी यांने त्याचे साथीदार समवेत सोलापूर ग्रामीण
जिल्हयात खालील घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.
आरोपीत याचेकडुन वरील गुन्हयातील १२० ग्रॅम २ मीली सोने व २० ग्रॅम चांदीचे सिक्के व एक चारचाकी स्वीफ्ट
कार असे एकुण ८,८२,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, व वरीष्ठ
पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विशाल वायकर, सपोफौ / निलकंठ
जाधवर, सपोफौ / प्रकाश कारटकर, पोहेकॉ / विरेश कलशेट्टी, पोकॉ/ बाळराजे घाडगे, अजय वाघमारे, अन्वर अत्तार, राहुल
दोरकर, हरीष थोरात, चापोका / सुनिल पवार, नातेपुते पोलीस ठाणे कडील पोना / राकेश लोहार, सायबर पोलीस ठाणे कडील
पोह / व्यकंटेश मोरे यांनी बजावली.
Post a Comment
0 Comments