सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
लोणंद पोलीस स्टेशननी पटकावली पाच बक्षीसे ..
मा. पोलीस अधीक्षक सातारा, व मा. अपर पोलीस
अधीक्षक सातारा यांचे हस्ते 79 हजार रुपयांचे रोख बक्षीस वाटप
लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, यांचे
मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी दमदार कारवाई केली असुन मा.
श्री समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते
लोणंद पोलीस स्टेशनला 79 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 472/2024 भा.न्या.सं.का. कलम 130 (1), 189 (2), 190,
191(2), (3) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपींबाबत कोणत्याही प्रकारचा पुरावा
नसताना सपोनि श्री सुशिल भोसले यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुध्दी कौशल्याचा
वापर करुन फिर्यादी हाच आरोपी असलेचे निष्पन्न करुन उर्वरीत आरोपी यांना काळज, नवी सांगवी, पिंपळे गुरव
पुणे येथून वेगवेगळया ठिकाणाहुन अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली आहे. याकरीता मा. श्री समीर
शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते 25 हजार
रुपयांचे रोख बक्षीस घेतले आहे.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 304/2024 भा.न्या.सं.का. कलम 137 (2), 34 (1), 65 (1), सह
पोक्सो कलम 4, 8, 12 या गुन्हयात पिडीत हिस कोणी पळवुन नेले याबाबत कसलाही पुरावा नसताना सपोनि
श्री सुशिल भोसले यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुध्दी कौशल्याचा वापर करुन पिडीत
हिस शोधुन तिचे नातेवाईकांचे ताब्यात देवुन आरोपीस अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली आहे.
याकरीता मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा
यांचे हस्ते 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस घेतले आहे.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 476/2024 भा.न्या.सं. कलम 309 (9), 3 ( 5 ) या गुन्हयात
आरोपी रोहीत ऊर्फ टक्या चिवळया पवार रा. सुरवडी ता. फलटण, आकश ऊर्फ गमज्या ऊर्फ पप्या टेलरिंग
भोसले रा. बोरी ता. खंडाळा, पायगुण खमखम भोसले रा. हळगाव ता. जामखेड यांना सुरवडी येथुन पळुन जात
असताना आर.सी.पी. 3 यांची मदत घेवुन नियोजनबध्द सापळा रचुन ऊसाचे शेतातुन अत्यंत शिताफीने पकडुन
सदर आरोपींनी लोणंद, खंडाळा, फलटण शहर, भुईज पोलीस ठाणेत 2 घरफोडी, 3 जबरी चोरी, 5 मोटार
सायकली चोरी व इतर इलेक्ट्रीक मोटार चोरीचे गुन्हयांची उकल करुन त्यांचेकडुन 6,85,700/- रुपये किंमतीचा
मुददेमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी केलेने मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली
कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस घेतले आहे.
तसेच लोणंद पोलीस स्टेशनला प्राप्त होणारे वॉरंटची जास्तीत जास्त बजावणी असल्याने त्याकरीता 2
हजार रुपये बक्षीस व पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणारे मुददेमालाची जास्तीत जास्त निर्गती होत असल्याने
त्याकरीता 2 हजार बक्षीस मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस
अधीक्षक, सातारा यांचे हस्ते लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पटकावुन सातारा जिल्हयात
लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई होत असलेचा ठसा उमटवला आहे.
मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा.डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा
यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, विशाल कदम पोलीस उपनिरीक्षक,
विष्णु धमाळ सहा. पोलीस फौजदार, पोलीस हवालदार नितीन भोसले, महेश टेकवडे, सर्जेराव सुळ, संतोष नाळे,
पोलीस कॉन्टेणंबल केतन लाळगे. अभिजीत घनवट, गोविंद आंधळे, विठठल काळे यांचे चांगले कामगीरीकरीता
कौतुक केले आहे.
Post a Comment
0 Comments