Type Here to Get Search Results !

महाविद्यालयीन जीवनात बजेट समजणे महत्त्वाचे-प्रा.डॉ. अशोक जाधव

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

महाविद्यालयीन जीवनात बजेट समजणे महत्त्वाचे-प्रा.डॉ. अशोक जाधव.



म्हसवड देशाचा अर्थसंकल्प कसा तयार होतो, तो संसदेत कसा

मांडन जातो, एक रूपया कसा येतो व कसा जातो, असे विचार

मांडून, विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात बजेट

समजणे अतिशय महत्वाचे असते असे प्रतिपादन मुधोजी

महाविद्यालय फलटण येथील अर्थशास्य विभाग प्रमुख

प्रा.डॉ. अशोक जाधव यांनी केले म्हसवड येथील फलटण

एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने

महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित

'अंदाजपत्रक- २०२४ या विषयावरील कार्यक्रमात ते प्रमुख

वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र

विभाग प्रमुख व सीडीसी सदस्य प्रा. डॉ. जयश्री चव्हाण

यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. संजय दीक्षित हे होते.

कार्यक्रमास मुधोजी महाविद्यालयाचे इतिहास विभाग-

प्रमुख प्रा.डॉ. अनिल टिके यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका,

शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिकी बहुसंख्येने

उपस्थित होते उपस्थितांचे प्रा.डॉ. संतोष लाळगे यांनी

आभार मानले.

Post a Comment

0 Comments