Type Here to Get Search Results !

फलटण येथे जनावरांची वाहतूक व कत्तल करणा-या०४ जनांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण येथे जनावरांची वाहतूक व कत्तल करणा-या०४ जनांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार.


(सातारा जिल्हयातील फलटण तालुका परिसरातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणा-या०४ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार )

सातारा जिल्हयामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) तौफिक इम्तियाज

कुरेशी, वय २३ वर्षे, तसेच टोळी सदस्य २) इलाही हुसेन कुरेशी, वय २५ वर्षे, ३) अरबाज इम्तियाज कुरेशी, वय २८ वर्षे,

४ ) इनायत हुसेन कुरेशी, वय २७ वर्षे, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा यांचे टोळीवर फलटण ग्रामीण

पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम

१९६० हे कायदे लागु असताना आणि सदर कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास, कत्तलीसाठी वाहतुक करणे,

कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करणेस मनाई असताना देखील यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गोवंशीय जनावरांची

कत्तलीसाठी वाहतुक करताना मिळुन आल्यामुळे त्यांचेवर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी

श्री. सुनिल महाडीक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण

सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर

केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी

केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांगध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही

त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही, या टोळीमधील इसम हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने

गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर

या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर १) तौफिक इम्तियाज कुरेशी, वय २३

वर्षे, तसेच टोळी सदस्य २) इलाही हुसेन कुरेशी, वय २५ वर्षे, ३) अरबाज इम्तियाज कुरेशी, वय २८ वर्षे, ४) इनायत हुसेन

कुरेशी, वय २७ वर्षे, सर्व. रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण,

जि. सातारा यांची सुनावणी होवून त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र

पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोक्काक ५५ प्रमाणे ३१ उपद्रवी टोळयांमधील १०० इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८

इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ० इसमांना असे एकुण १३१ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन

एमपीडीए कायदयाअंतर्गत १ इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील

सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा प्रमोद सावंत,

अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोहवा वैभव सूर्यवंशी, पोना

श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments