Type Here to Get Search Results !

भवानी माता मंदिर साखरवाडी येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महाआरती संपन्न..!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ वैभव जगताप 

भवानी माता मंदिर साखरवाडी येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महाआरती संपन्न..!


साखरवाडीच्या श्री.भवानीमाता मंदिरातील शारदीय नवरात्रौत्सवात भाविकांची अलोट गर्दी.

साखरवाडी ता.फलटण,जि.सातारा बाजारपेठेतील श्री.भवानीमाता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त होत असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रम , उपक्रम , स्पर्धा ,महाआरती इत्यादीसाठी परिसरातील भाविकांची प्रचंड अलोट गर्दी होताना दिसत आहे.मंगळवार दिनांक ०८/१०/२४ ची संध्याकाळची महाआरती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री शंकरराव माडकर,श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन माननीय श्री नितीन भोसले यांचे शुभहस्ते सपत्नीक करण्यात आली.                 

उत्सव व शारदोत्सव मंडळ साखरवाडी विषयी अधिक माहिती देताना मंडळाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर यांनी सांगितले की १९८५ साली स्थापन झालेले हे मंडळ यावर्षी आपला ४० वा श्री शारदोत्सव साजरा करत असून साखरवाडी परिसरातील एक उपक्रमशील मंडळ म्हणून सर्वपरिचित आहे.स्थापनेपासूनच अनेकविध धार्मिक , सामाजिक , आध्यात्मिक , राष्ट्रीय कार्यक्रम व उपक्रम तसेच शालेय विद्यार्थी आणि महिला भगीनींसाठी आकर्षक रक्कमेच्या विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. याही वर्षी रांगोळी , चित्रकला , निबंध , विविध कलागुण , विना गॅस पाककृती इत्यादी स्पर्धा सोबत नवरात्री स्पेशल प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि चला खेळू पैठणीसाठी ही स्पर्धात्मक खेळांची स्पर्धा महिला भगिनींसाठी आयोजित केली आहे. रक्तदान शिबिर , वृक्षारोपण, आरोग्य तपासणी इत्यादी राष्ट्रीय उपक्रम दरवर्षी राबवले जातात.दररोज संध्याकाळी होणाऱ्या महाआरती साठी हजारोंचा भक्त समूदाय उपस्थित असतो.संपूर्ण परिसर मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने बहरून जातो.मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय शिवराम भोसले यांचे मार्गदर्शनाखाली इतर सगळे सभासद अहोरात्र झटून उत्सव अधिकाधिक सुयोग्य होण्यासाठी सहकार्य करत असतात.

Post a Comment

0 Comments