Type Here to Get Search Results !

सातारा (मंगळवार पेठ) येथील श्रवण संदिप पवार, दोन वर्षाकरिता हद्दपार.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सातारा (मंगळवार पेठ) येथील श्रवण संदिप पवार, दोन वर्षाकरिता हद्दपार.


पोलीस निरीक्षक, शाहुपूरी पोलीस स्टेशन, यांचेकडील जावक क्र. 1692/2024, दिनांक 14/03/2024 अन्वये

 नियोजित हद्दपार, हा इसम श्रवण संदिप पवार, रा. 408, मंगळवार पेठ, सातारा यांचे विरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव या कार्यालयाकडे पाठविण्यात आला. पोलीस निरीक्षक, शाहुपूरी पोलीस स्टेशन यांनी हद्दपार प्रस्ताव क्रमांक 01/2023 अन्वये संबंधितास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 (1) (अ) प्रमाणे कामकाज चालवून त्यास सातारा, सांगली, पुणे,कोल्हापूर या चार जिल्ह्यातुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणेसाठी कारवाई करावी म्हणून प्रस्ताव सादर केलेला आहे.

त्याबाबत पुढीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहे.

आदेश

अपचारी श्रवण संदीप पवार रा. 408 मंगळवार पेठ, सातारा यास या आदेशाचे दिनांकापासून सहा महिने

कालावधीसाठी सातारा जिल्ह्यामधून हद्दपार करणेत येत आहे. अपचारी हा सदरच्या आदेशापासून दोन दिवसांचे आंत

तात्काळ रस्ते / रेल्वे मार्गाने सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून निघून जाईल किंवा त्याला घालवून दिले जाईल व त्या

तारखेपासून सहा महिने मुदती करीता सातारा जिल्ह्यामध्ये त्याने उपविभागीय दंडाधिकारी, सातारा उपविभाग सातारा यांचे

लेखी परवानगी शिवाय प्रवेश करु नये किंवा परत येवू नये असे आदेशीत करीत आहे.

अपचारी श्रवण संदीप पवार रा. 408 मंगळवार पेठ, सातारा याने या आदेशाच्या कालावधीत सातारा जिल्ह्या

व्यतिरीक्त इतरत्र राहील तेथील नजिकच्या पोलीस स्टेशनला तसेच शाहुपूरी पोलीस स्टेशनला महिन्यातून एकदा त्याचे

राहण्याचे ठिकाण, पत्ता त्यात बदल झाला नसला तरीही पोस्टाने अगर प्रतिनिधी मार्फत लेखी माहिती द्यावी. तसेच सदरच्या

आदेशाच्या कालावधीत त्याने महाराष्ट्र राज्याचे बाहेर निघून जाणेचे असलेस 10 दिवसांचे आंत संबंधीत पोलीस स्टेशनला

व शाहुपूरी पोलीस स्टेशनला माहिती पोस्टाने अथवा प्रतिनिधी मार्फत लेखी दिली पाहिजे. तदनंतर महाराष्ट्र राज्यामध्ये

परत आले नंतर 10 दिवसांचे आंत रहात असलेल्या भागाचे नजीकैच्या पोलीस स्टेशनला व शाहुपूरी पोलीस स्टेशनला

माहिती पोस्टाने अथवा प्रतिनिधी मार्फत लेखी दिली पाहिजे.

Post a Comment

0 Comments